35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयराष्ट्रपती पदाच्या चर्चेवरून अतुल भातखळकरांचा शरद पवारांना खोचक टोला

राष्ट्रपती पदाच्या चर्चेवरून अतुल भातखळकरांचा शरद पवारांना खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :- देशातील राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा’ अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे (Atul Bhatkhalkar slammed Sharad Pawar).

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट देखील केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ‘किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा, असे ट्विट करत भातखळकरांनी शरद पवारांना टोला लगावला आहे (By tweeting Bhatkhalkar has lashed out at Sharad Pawar).

नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; मोदी सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे

मेट्रो 3 आणि 6 च्या कारशेडसाठी गोरेगाव पहाडी भागाचा विचार व्हावा – उद्धव ठाकरे

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सध्या देशातील विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी बैठकांचा सपाटा लावला आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली, तर त्या आधी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. शरद पवार यांना येत्या राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचा चेहरा करण्यासाठी ही मोर्चेबांधणी चालू असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकरांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

Atul Bhatkhalkar slammed Sharad Pawar
अतुल भातखळकर आणि शरद पवार

दहावीचा निकाल १६ जुलैला जाहीर होणार; या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

Sharad Pawar meets Uddhav Thackeray amid reports of trouble in Maha Vikas Aghadi alliance

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अतुल भातखळकर म्हणाले. किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा’ अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया दिली. पवारांनी पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा सोडलेली दिसते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षाची हालचाल बघून मला ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’, अशी मराठी म्हण मला आठवत असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. अशा हस्यास्पद हालचाली सुरू असल्याचा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

इतकेच नाहीतर निवडणुकांचा विचार केला तर लोकसभा, राज्यसभेमध्ये भाजपला बहुमत आहे आणि त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी