28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयअरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते; नाना पटोले

अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते; नाना पटोले

टीम लय भारी

मुंबई :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर लढण्याचा सातत्याने नारा देत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या तीन दिगग्ज नेत्यांची बैठक झाली. परंतु, या बैठकीत नाना पटोले उपस्थिती नव्हते. त्यावर नाना पटोले म्हणाले, अरे भाई गुस्से की बात नही, या भेटीसाठी मला शरद पवारांचे निमंत्रणच नव्हते, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे (Nana Patole has said that Sharad Pawar was not invited).

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. पण या बैठकीला नाना पटोले नव्हते. त्याबाबत आज नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले, अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते, की नानांना घेऊन या वगैरे, मला त्या भेटीची माहितीही नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यावर मी विचारले, त्यावर त्यांनी मला सांगितले ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यामुळे माझा राग वगैरे काहीही नाही. मी माझ्या पक्षाचे काम करतोय, जर माझ्या पक्षाचे काम करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण नाही.

शरद पवारांचा कॉंग्रेसला सवाल, खरंच तुम्ही एकट्याने निवडणुका लढणार आहात का?

शरद पवार आणि कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीनंतर; प्रविण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली होती. मात्र, 2024 मध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले आहेत (That is what Nana Patole has said).

Nana Patole has said that Sharad Pawar was not invited
नाना पटोले

अमोल मिटकरींनी पंकजा मुंडेंना दिला महत्त्वाचा सल्ला!

Why everyone’s upset with Maharashtra Congress chief Nana Patole — Sena, NCP & his own party

नाना पटोले देणार राज्यापालांना निवेदन

मी माझ्या पक्षाचे काम करतोय, 2024 मध्ये काँग्रेस पक्ष देशात सरकार बनवेल. खडसेंचे राजकीय खच्चीकरण फडणवीस यांनी केले, जर चौकशी झाली तर तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील. लोकांची दिशाभूल करण्याचे काम फडणवीस करतात. उद्या भाजपमुळे देशात जी परिस्थिती आहे, त्याासंदर्भात राज्यापालांना निवेदन देणार आहे. पक्षाचे काम पक्ष करणार, सरकार सरकारचे काम करेल. मला भाजपवर अटॅक करायची जबाबदारी दिलेय, मी रोज भाजपच्या नितीवर अटॅक करत राहणार, असेही नाना पटोले म्हणाले (I will continue to attack the BJP’s policy every day, said Nana Patole).

आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. महाआघाडीत कोणतेही फेरबदल सध्यातरी नाहीत. हायकंमाड जे निर्देश देतील त्यावर मी काम करतो. भाजपला पर्याय फक्त काँग्रेस आहे. ओबीसींचे आरक्षण भाजपने संपवले त्याविरोधात राज्यात आम्ही आंदोलन करणार आहोत, असेही नाना पटोले म्हणाले आहेत (We will agitate in the state against the BJP decision to end OBC reservation Patole said).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी