25 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरटेक्नॉलॉजीचांद्रयानातील प्रज्ञान रोवर नक्की काय करणार?

चांद्रयानातील प्रज्ञान रोवर नक्की काय करणार?

चांद्रयान ३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लॅंडींग करून इतिहास घडवला आहे. बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून इतिहासात असे करणारा पहिला देश होण्याचा मान भारताने मिळवला आहे. जगभरात भारताच्या या चांद्र मोहिमेची चर्चा होत आहे.

चंद्रभूमीवर विक्रम लँडरने लँड केल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुळ उडाली. ही धुळ पुन्हा खाली बसल्यानंतर जवळजवळ अडीच तासानंतर विक्रम लँडर मधून प्रज्ञान रोवर बाहेर पडले. प्रज्ञान रोवर म्हणजे एक सहा चाकी रोबोटिक वाहन आहे. चंद्रावरील फोटोज क्लिक करणे, चंद्रावरील हवामानाची माहिती घेणे तसेच चंद्राच्या पृष्ठभागाची आणि पृष्ठभागांखालील माहिती मिळवणे ही प्रज्ञान रोवर ची कामे आहेत.

प्रज्ञान रोवर फक्त विक्रम लँडरशीच संपर्क करू शकत असल्यामुळे तो मिळवलेली माहिती विक्रम लँडरकडे पाठवेल आणि विक्रम लँडरद्वारे मिळालेली माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचेल.

ह्या रोवरच्या चाकांवर अशोकचिन्ह आणि इस्रोचं चिन्ह कोरण्यात आले असल्याने जसेजसे रोवर पुढे सरकेळ तसे चंद्रावर अशोक चिन्ह आणि इस्रोची चिन्हे उमटणार आहेत.

हे ही वाचा 

कॉंग्रेसचे नेते हरखले, चांद्रयान ३ चे लँडींग पाहण्यासाठी बैठक थांबविली !

भारताने घडवला इतिहास, चांद्रयान- 3 चे यशस्वी लॅंडींग !

मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसेमध्ये जुंपली

चंद्रावरील १ दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसंा इतका असल्यामुळे आणि विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर सौर उर्जेवर काम करीत असल्यामुळे लॅंडींगपासून १४ दिवस हे दोन्हीही चांद्रभूमीवर कार्यरत असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी