29 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरराष्ट्रीयअखेर ठरलं! 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी युतीचे नाव INDIA,जाणून घ्या याचा अर्थ

अखेर ठरलं! 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी युतीचे नाव INDIA,जाणून घ्या याचा अर्थ

बंगळुरू येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत त्यांच्या आघाडीचे नाव INDIA, म्हणजेच Indian National Democratic Inclusive Alliance असा या नावाचा फूलफॉर्म सांगण्यात आला असून मराठीमध्ये याचा अर्थ ‘भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी’ असा आहे. ही बैठक दोन दिवसांची असून यात एकूण 26 पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. बैठकीला उपस्थितीत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की ही एक चांगली, अर्थपूर्ण बैठक आहे. या बैठकीत विधायक निर्णय घेतले जातील. आज आपण जी चर्चा केली त्याचा परिणाम या देशातील जनतेसाठी चांगला होऊ शकतो.

17 आणि 18 जुलैला बंगळुरूमध्ये 26 पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. आज दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आपल्या गटाचे नाव ठरवले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया हे नाव सुचवले आहे. यूपीए आता इंडिया नावाने ओळखली जाणार आहे. UNITED WE STAND अशी विरोधी आघाडीची टॅगलाइन असेल.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान मोदींना गेली 10 वर्षे देशावर राज्य करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी देशातील जवळपास सर्वच क्षेत्र पूर्णपणे उद्धवस्त केले. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, इतकी महागाई आहे. सर्वच क्षेत्रात प्रंचड बेरोजगारी आहे. या देशातील जनतेला त्यातून मुक्त करायचे आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

हे सुद्धा वाचा:

महाराष्ट्राचा नकाशा भाषावार प्रांत रचनेप्रमाणे होणार का? – आव्हाड यांचा सवाल

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणातील पिडीत महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे; निलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

मंत्री अभ्यास न करता सभागृहात कसे येतात, विरोधकांसह भाजपचे आशीष शेलार देखील संतप्त

बैठकीच्या पहिल्या दिवशी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाचं स्नेहभोजन झाले होते. ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधकांची बैठक सुरू आहे. मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला असे इतर अनेक नेते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी