26 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरराजकीयमहाराष्ट्राचा नकाशा भाषावार प्रांत रचनेप्रमाणे होणार का? - आव्हाड यांचा सवाल

महाराष्ट्राचा नकाशा भाषावार प्रांत रचनेप्रमाणे होणार का? – आव्हाड यांचा सवाल

महाराष्ट्रात १०५ हुतात्मे झाल्यावर भाषावार प्रांत रचनेत हद्द आखली गेली. विविध राज्याची गावे/ हद्द हळूहळू महाराष्ट्राला जोडली गेली, गिळंकृत केली जात आहे. महाराष्ट्राचा नकाशा भाषावार प्रांत रचनेप्रमाणे होणार का, असा सवाल राष्ट्रवादी प्रतोद आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

महाराष्ट्र, गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायती नंतर शेजारच्या झाई गावाच्या जमिनीवर गुजरात राज्याने अतिक्रमण केल्याने मोठाच वाद दोन गावात आहे, ही बाब माकपचे तलासरीचे आमदार विनोद निकोले यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केल्यावर त्यावर आव्हाड बोलत होते. महाराष्ट्रातील अनेक गावे शेजारची राज्ये गिळंकृत करत आहेत. त्यावर सरकार कधी बोलणार, सरकारला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का, असा सवालही आव्हाड यांनी केला.

हे सुद्धा वाचा 
 किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणातील पिडीत महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे; निलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणाचे विधानपरिषदेत पडसाद; अंबादास दानवेंकडून पेनड्राईव्ह सादर

मंत्री अभ्यास न करता सभागृहात कसे येतात, विरोधकांसह भाजपचे आशीष शेलार देखील संतप्त

गावाच्या बखेड्यामुळे वाद वाढतच चालले आहेत. त्यामुळे सरकारने या गावांच्या हद्दी निश्चित कराव्यात, अशी मागणी आमदार विनोद निकोले आणि मनीषा चौधरी यांनी केली. त्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, सोमवारी वा मंगळवारी हद्दी निश्चितीसाठी बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी