35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयNIA Raids: राष्ट्रीय तपास यंत्रणेने गॅंगस्टर्सच्या अटकेसाठी देशभरात ६० ठिकाणी धाडी टाकल्या

NIA Raids: राष्ट्रीय तपास यंत्रणेने गॅंगस्टर्सच्या अटकेसाठी देशभरात ६० ठिकाणी धाडी टाकल्या

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) कुख्यात गॅंगस्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अटकेसाठी देशामध्ये तब्बल ६० ठिकाणी धाडी टाकल्या. दिल्ली, नवी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये धाडी टाकण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) कुख्यात गॅंगस्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अटकेसाठी देशामध्ये तब्बल ६० ठिकाणी धाडी टाकल्या. दिल्ली,  हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये धाडी टाकण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल या पथकाकडून लारेन्स बिश्नोई गॅंग, बंबिहा गॅंग आणि नीरज बवाना गॅंग यांच्या विरोधात UAPA म्हणजेच Unlawful Activity Prevention Act कायदयाअंतर्गत दोन FIR (First Information Report) दाखल केल्या आहेत. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा खोलात जाऊन त्याची तपासणी करत आहेत. पंजाब राज्याचे डीजीपी गौरव यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, अतिरेकी संघटना आणि सिधू मूसेवाला हत्येत सहभागी असलेल्या गॅंगस्टर्सचे साटेलोटे आहे. पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना भारतात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांच्या मार्फत भारतात घातपात आणू शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तविली होती.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, नीरज सहरावत उर्फ नीरज बवाना आणि त्याचे सहकारी देशातील प्रसिद्ध व्यक्तींच्या हत्येमध्ये सहभागी आहेत आणि सोशल मीडीयाद्वारे आपल्या गॅंगची दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नीरज बवाना आणि लारेन्स बिश्नोई गॅंगमध्ये गॅंगवार सुरू आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिधू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी लारेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. त्यानंतर नीरज बवानाच्या टोळीने आम्ही लारेन्स बिश्नोई गॅंगचा नायनाट करू आणि सिधू मुसेवालाच्या हत्येचा सूड घेऊ असे सोशल मीडीयाद्वारे स्पष्ट करून आपले मनसुबे जाहीर केले होते.

विविध राज्यामधील कारागृहात कैद असलेले आणि भारताबाहेरून आपल्या टोळयांना नियंत्रित करणाऱ्या गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने हया धाडी टाकल्याचे बोलले जात आहे. हया टोळीमध्ये कॅनडा स्थित गोल्डी ब्रार नामक गॅंगस्टरचा समावेश होतो ज्याने पंजाबी गायक सिधू मुसेवालाची हत्या घडवून आणल्याची जबाबदारी घेतली होती.

हे सुद्धा वाचा –

Media Scrutiny: मी माझ्या हॉटेल रूममध्ये वर्तमानपत्र टाकण्यास मनाई केली होती : सौरव गांगुली

Ajit Pawar : नवी दिल्लीतील रूसवे – फुगवे, अजितदादांनी सांगितली खरी कारणे !

Narayan Rane : शिंदे गटाबाबत नारायण राणे यांचे मोठे विधान

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दाखल केलेल्या FIR असे नमूद केले आहे की, लारेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार, विक्रम ब्रार, जग्गू भगवानपुरीया, संदीप, सचिन थापन आणि अनमोल बिश्नोई हे गुन्हेगार विविध राज्यातील कारागृहातून आणि कॅनडा, पाकिस्तान व दुबईमधून त्यांच्या सहकऱ्यांना गुन्हेगारी कारवाया करण्याबाबत आदेश देत आहेत.

पहिल्या FIR मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, कुख्यात गॅंगस्टर लारेन्स बिश्नोईची खलिस्तान समर्थक हरविंदर सिंग रींडाशी जवळीक आहे जो सध्या कथितपणे पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहे.

UAPA कायदयाअंतर्गत दाखल केलेल्या दुसऱ्या FIR मध्ये लारेन्स बिश्नोई गॅंगचा शत्रू असलेल्या बंबिहा गॅंग आणि त्याचा सहकाऱ्यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त अर्मेनिया स्थित लकी पटियाल, हरियाणा कारागृहात कैद असलेला कौशल चौधरी आणि तिहार जेलमध्ये कारागृहात कैद असलेला नीरज बवाना यांचा समावेश आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी