31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईNarayan Rane : शिंदे गटाबाबत नारायण राणे यांचे मोठे विधान

Narayan Rane : शिंदे गटाबाबत नारायण राणे यांचे मोठे विधान

प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याने मोठा राडा झाला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी सकाळी शिंदे गटातील नेते सदा सरवणकर यांच्या घरी भेट दिली, त्यामुळे दोघांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात उलट - सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यात सध्या सत्ताकारणामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडत असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षात मोठी फूट पडली आणि शिवसेनेतच दोन गट पडले. एकमेकांना न जुमानता सतत आरोप – प्रत्यारोपांच्या खेळ आता रोजच होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभादेवी येथे शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले आणि एकच राडा झाला, वाद पोलिसांपर्यंत पोहोचला असला तरीही आग विझलेली नाही आणि अशातच या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिंदेगटाच्या बाजूने काही महत्त्वपूर्ण विधाने केल्यामुळे हे प्रकरण आणखी तापले आहे.

प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याने मोठा राडा झाला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी सकाळी शिंदे गटातील नेते सदा सरवणकर यांच्या घरी भेट दिली, त्यामुळे दोघांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात उलट – सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर नारायण राणे यांनी या प्रकरणावर भाष्य करीत महाराष्ट्रात राहायचंय-फिरायचंय ना? अशा भाषेत त्यांनी ठाकरे समर्थकांना सज्जड दम दिला आहे. नारायण राणेंची एन्ट्री आता या प्रकरणाला कोणती दिशा देणार हे पाहणे या निमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Nitin Gadkari : अक्षय कुमार यांच्या जाहिरातीवरून नितीन गडकरी ‘टार्गेट’

BMC : मुंबईतील शौचालयांमध्ये करोडोंचा घोटाळा !

Milk Price : दूध दर वाढीचे संकट लवकरच कोसळणार

सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) भेटीनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी राणे म्हणाले, सदा सरवणकर माझे मित्र आहेत, काल जो प्रकार घडला, त्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या हेतूने आलोय. तक्रार दिली आहे त्याची पोलीस चौकशी करतील. फायरिंग झालेय असं म्हणता, तर आवाज आला का? असा सवाल करीत राणे यांनी ठाकरे समर्थकांना सुनावले आहे.

दुसरं काही काम उरलेलं नाही. पण असले हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल. पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलो. आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. 50 जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो असे म्हणून त्यांनी धमकीच्या सुरात नारायण राणे यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पुढे नारायण राणे म्हणतात, आम्ही धांगडधिंग्याची दखल घेत नाही, नाहीतर त्यांचं चालणं फिरणं कठीण होईल. शिंदे गटच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतील, धनुष्यबाण चिन्हही त्यांनाच मिळणार असे म्हणून नारायण राणे यांनी शिंदे गटावर विश्वास व्यक्त करत मोठे विधान केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंत्री राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे हे नेमकं प्रकरण?

अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवी येथे शिंदे सेना आणि ठाकरे सेना आमने सामने आल्याने मोठा राडा झाला. राड्याचे प्रकरण इतके विकोपास गेले की पुन्हा त्या परिसरात दोनदा राडा झाला. यावेळी शिंदे गटातील नेते सदा सरवणकर यांनी खाजगी पिस्तुल काढत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची दखल घेत दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सदा सरवणकर यांनी आरोप फेटाळत मी गोळीबार केलेला नाही, शिवसेनेकडून माझा बदनामीचा डाव रचत असल्याचा दावा यावेळी केला आहे. मी केवळ परिस्थिती शांत करण्यासाठी प्रभादेवीला गेलो होतो. माझी कितीही बदनामी केलीत तरी मी त्याला माझ्या कामातून प्रत्युत्तर देईन, असे म्हणून त्यांनी या प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी