31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeराजकीयAjit Pawar : नवी दिल्लीतील रूसवे - फुगवे, अजितदादांनी सांगितली खरी कारणे...

Ajit Pawar : नवी दिल्लीतील रूसवे – फुगवे, अजितदादांनी सांगितली खरी कारणे !

नवी द‍िल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवार यांना बोलू न ‍दिल्याने ते रागावले असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुर्णविराम दिला आहे.

नवी द‍िल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात अजित पवार यांना बोलू न ‍दिल्याने ते रागावले असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुर्णविराम दिला आहे. अनेकांना वाटले होते. राष्ट्रीवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्यास संधी दिली म्हणून अजित पवार नाराज झाले. मात्र तसे काहीही झाले नाही. अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेते आणि प्रदेशाध्यक्षांनी बोलणे अपेक्षित असते. त्यामुळे आपण बोलणे टाळल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. त्यामुळे दिल्लीमध्ये झालेल्या रुसवे फुगव्यांच्या प्रकरणाला पुर्णविराम मिळाला.  दिल्लीमध्ये दोन दिवसांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आपले विचार मांडले.

आपल्या राज्याच्यावतीने जयंत पाटील यांनी विचार मांडले. मला कोणी बोलू नको असे म्हटले नाही. परंतु माध्यमांनी लोकांमध्ये गैरसमज पसरवला. कारण मी दोन वेळा वॉशरुमला गेलो. अनेकांना बोलायला मिळाले नाहीत. त्यात सुन‍िल तटकरे, खासदार वंदना चव्हाण यांना देखील बोलायला मिळाले नाही. यावेळी माध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवल्या वस्तुस्थितीवर आधारीत बातम्या देण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. आशा प्रकारे अजित पवार यांनी माध्यमांना देखील धारेवर धरले. 1991 पासून मी 31 वर्षे अधिवेशनाला उपस्थित राहतो. मात्र मार्गदर्शन करत नाही.

केवळ राज्यातील सभा तसेच अधिवेशनात मी बोलतो असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी दिले. त्यामुळे गैरसमज दूर करुन राज्यातील प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलणे गरजेचे आहे. यावेळी अजित पवार यांनी पैठण मधील सभेला गर्दी जमवण्याच्या एकनाथ शिंदेच्या धोरणावर सडकून टीका केली. एकनाथ शिंदेच्या सभेला अंगणवाडी सेव‍िका, मदतनीस, पर्यवेक्ष‍िकांना उपस्थ‍ित राहण्यासाठी परिपत्रक काढण्याची वेळ आली. हे पत्र त्यांनी पत्रकार‍ परिषदेमध्ये दाखवले.

हे सुद्धा वाचा

BMC : मुंबईतील शौचालयांमध्ये करोडोंचा घोटाळा !

Milk Price : दूध दर वाढीचे संकट लवकरच कोसळणार

Potraj : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ‘पोतराज’ मुंबईच्या रस्त्यांवर मागून खातो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गर्दी जमवण्यासाठी असे प्रयत्न करावे लागले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असा हल्लाबोल त्यांनी माध्यमांसमोर केला. राज्यातील जिल्हयांना अजून पालकमंत्री मिळालेले नाहीत. हिवाळी आधिवेशनापर्यंत पुढचा मंत्रीमंडळ विस्तार रखडण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली. दादरमध्ये गणेश विसर्जनाच वेळी झालेल्या घटेनवरुन त्यांनी सरकारचे कान उपटले. कुणीपण उठतो आणि रिव्हॉल्व्हर काढतो.

हे युपी, बिहार आहे का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. मंत्रालयात खुप फाईल तुंबल्या आहेत. त्याचा निपटारा करण्याचे काम मुख्यमंत्री करतात. परंतु आपले मुख्यमंत्री गणपतीचे दर्शन घेण्यात व्यस्त होते. आता सभा, मेळावे घेत आहेत. अशा प्रकारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी