33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयनवाब मालिकांनी जाहीर केला समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’

नवाब मालिकांनी जाहीर केला समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’

टीम लय भारी

मुंबई: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सातत्याने मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर नवनवीन आरोप करताना दिसत आहेत. आज सकाळी नवाब मलिक यांनी ट्विटवर शुभ प्रभात म्हणत समीर वानखेडेंबाबतचा नवा खुलासा केला आहे. मलिकांनी वानखेडे यांचा निकाहनामा ट्वीट करून जारी केला आहे(Nawab Malik has said good morning on Twitter and made a new revelation about Sameer Wankhede.)

 तसेच मलिकांनी समीर वानखेडेंच्या पहिला लग्नाचा फोटो शेअर केला आहे आणि म्हटलं आहे की, ‘स्वीट कपल समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी.’ दरम्यान या लग्नात ३३ हजार रुपयांची मेहर घेण्यात आल्याचे मलिकांनी सांगितलं आहे.

मुंबईतील महिलेने OLX वर टाकली जाहिरात आणि गमावले पाच लाख रुपये

WhatsApp वर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? या ट्रिकने ग्रुप न बनवता करता येईल काम

नवाब मलिकांनी ट्वीटमध्ये नक्की काय म्हटले ?

नवाब मलिकांनी पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘७ डिसेंबर २००६ रोजी गुरुवारी रात्री ८ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचं लग्न पार पडलं. हे लग्न मुंबईतील अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये झालं होत.’

तर मलिकांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘या लग्नात ३३ हजार रुपयांचा मेहर घेण्यात आला होता. यामध्ये २ नंबरचा साक्षीदार अजीज खान होते. समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांचे अजीज खान पती आहेत.’ या ट्वीटनंतर नवाब मलिक यांनी स्वीट कपल म्हणत समीर वानखेडे आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाच्या सर्टिफिकेटचा फोटो देखील शेअर केला आहे.

धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक !

Aryan Khan drugs case: Nawab Malik steps up attack, shares NCB official Sameer Wankhede’s ‘Nikah Nama’

दरम्यान अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आज नवाब मलिका काय नवा खुलासा करतात आणि समीर वानखेडेंवर कोणता नवीन आरोप करतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी