35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रएनसीबीने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू

एनसीबीने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू

टीम लय भारी

नांदेड : अंमली पदार्थ विरोधी पथकाने  नांदेडमध्ये  मोठी कारवाई करत 100 किलो अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. पण, या कारवाईमध्ये अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला. या आरोपीच्या मृत्यूमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.मागील महिन्यात 22 नोव्हेंबर रोजी एनसीबीच्या मुंबई टीमने नांदेड शहराजवळील बोंढार शिवारात छापा मारला होता. यावेळी 100 किलो पोपीस्ट्रॉ आणि दीड किलो अफीमचा साठा मिळून आला होता. या प्रकरणात एनसीबी ने 4 आरोपींना अटक केली होती. चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत नांदेडच्या कारागृहात आहेत(NCB arrested Accused dies in jail, Nanded).  

दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सोबतच्या कैद्यांनी आवाज दिल्यानंतर जितेंद्र सिंघ हालचाल करत नव्हताः कारागृह अधीक्षकांना याबाबत माहिती समजल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रात्रीच्या दरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. जितेंद्रसिंध याचे कॅमेरा शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं कारण समोर येणार आहे.

आर्यन खान प्रकरणातील NCB चा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा;शिवसेनेचा हल्लाबोल

अर्जुन खोतकरांच्या घरी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीचा मुक्काम! साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू!

मुंबईत येणारे अमली पदार्थ नांदेड जिल्ह्यातील कामथा येथे तयार होत असल्याची गुप्त माहिती एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने तेथील एका घरावर छापा टाकला. त्यावेळी तेथे घरातच अमली पदार्थ तयार होत असल्याचे दिसून आले. खसखशीचा भूसा व अफूच्या बिया यापासून हे अमली पदार्थ तयार होत होते.मुंबई एनसीबीच एक पथक नांदेडमधील सीमावर्ती भागात तळ ठोकून होते. नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून गांजा भरून जाणारा ट्रक राज्यात दाखल झाला.

NCB, ED वापरून झाली असेल तर सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा : संजय राऊत

Aryan Khan moves HC seeking relief from Friday attendance at NCB office

एनसीबीच्या पथकाने तब्बल 22 किलोमीटर पाठलाग करत हा ट्रॅक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 101 किलो गांजा आढळला. गांजा घेऊन हा ट्रक जळगाव येथे जाणार होता. दरम्यान, ट्रक चालक गोकुळ नारायण राजपूत आणि सुनिल यादव महाजन यांना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी