33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांचं निधन

ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांचं निधन

टीम लय भारी

कोल्हापुर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान एन.डी.पाटील यांनी वयाच्या 93 वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांची प्रकृती गंभीर होती. वातावरण बदलामुळे कणकण वाटत असल्यामुळे त्यांना कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे(ND Patil, SKP’s Senior leader passes away).

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एन.डी पाटलांना कोरोनाची लागण झाली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले(ND Patel had successfully defeated Corona in old age).

महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार व जनसामान्य यांच्या हिताचे रक्षण करणारे धीरोदात्त व्यक्तिमत्व. स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, भूमी मुक्ती आंदोलन,वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा लढा, एनरॉन विरोधी आंदोलन, सेझ विरोधी आंदोलन अशी सुमारे 70 वर्षाची संघर्षाची वाटचाल करणारे नेतृत्व आज शांत झाले.

राज्यात कष्ट करणाऱ्या जनतेच्या प्रत्येक लढ्यात एन.डी अग्रेसर होते.लोक संघर्ष मोर्चा चे खंबीर पाठीराखे होते . त्यांच्या संघर्षातूनच रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, समान पाणी वाटपाचा आग्रह या समाज हितैषी योजना उभ्या राहिल्या. अत्यंत अभ्यासू व आग्रही असणाऱ्या आदरणीय एन. डी. ना भावपूर्ण आदरांजली

हे सुद्धा वाचा

गणपतराव देशमुख हे खरे बुध्दिस्ट

कै. गणपतराव देशमुख यांना ‘पद्म’ सन्मान देण्याची मागणी !

Satej Patil questions govt’s silence on Tek Fog expose

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी