33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयगणपतराव देशमुख हे खरे बुध्दिस्ट

गणपतराव देशमुख हे खरे बुध्दिस्ट

अ‍ॅड. विश्वास काश्यप

माजी पोलिस अधिकारी, मुंबई

94 वर्षाचे सात्विक जीवन जगणारे आदरणीय गणपतराव देशमुख हे नुकतेच गेले. एक व्यक्ती एकाच मतदारसंघातुन अकरा वेळा विधानसभेत निवडून जाते ही काही साधी गोष्ट नाही. संपूर्ण भारतात तामिळनाडूचे दिवंगत नेते करुणानिधी आणि गणपतराव देशमुख हे दोघेच हा राजकीय विक्रम करू शकले (Both Ganapatrao Deshmukh were able to set this political record).

भारतीय राजकारणात एक से बढकर एक मुत्सद्दी राजकारणी असताना गणपतराव देशमुख म्हणूनच नियमाला अपवाद ठरतात. एकच मतदारसंघ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकच राजकीय पक्ष. एकच विचारधारा घेऊन इतकी दशके सामाजिक जीवनात वावरणे म्हणजे हे एक अविश्वसनीय असे रसायन आहे. सध्याच्या राजकारणात सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, भल्या पहाटे पक्ष बदलणाऱ्या राजकारणी मंडळींचा सुकाळ असताना गणपतराव देशमुख हे राजकारणातील सर्वोच्च नेते ठरतात.

वर्षानुवर्षे आपल्या विचारधारेपोटी एकनिष्ठ राहणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही. हे काम एक सच्चा बुध्दिस्टच करू शकतो. गणपतराव देशमुख हे जातीने जरी बौद्ध नसले तरी तेच खरे बुध्दिस्ट आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. कोणताही भौतिक मोह नाही. व्रत घेतल्यासारखे जगणे. मोह, माया, संपत्ती यात कशाचाही स्वार्थ नसणे. प्रेमाने वागणे. वंचित बहुजन लोकांच्या हक्कांसाठी लढणे हीच बुद्ध होण्याची खरी लक्षणे आहेत. तथागत बुद्धांनी सांगितले आहे की, जर तुमचे वागणे अशा प्रकारचे असेल तर ती व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करू शकते. म्हणूनच आम्हाला गणपतराव देशमुख सच्चे बुद्धाचे अनुयायी वाटतात. बुद्धिस्ट वाटतात.

राजकारणातील शेवटचा सज्जन माणूस हरपला

भारत आणि चीन सीमेदरम्यान सहावी हॉटलाईन प्रस्थापित

गेल्या काही वर्षापासून राजकारणात येणे म्हणजे राजकीय उद्योगात पदार्पण करणे असे झाले आहे. कोणताही धंदा करायचा झाला तर सर्वप्रथम त्या धंद्याला आवश्यक असणारी भांडवल गुंतवणूक ही करावीच लागते. ग्राहकाची सेवा करावीच लागते. राजकारणातील उद्योग चालू करते वेळी सुरुवातीला आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या वाढदिवसाला, सणासुदीला बॅनरबाजी यामध्ये आर्थिक गुंतवणूक करावी लागते.

आपल्या शहरातील ज्या गल्लीमध्ये ज्या ठिकाणी आपला नेता येईल त्याठिकाणी आपले तीन चार मित्रमंडळी नेऊन नेत्याच्या नजरेत आपण कसे दिसू अशा ठिकाणी उभे राहून घोषणाबाजी करावी लागते. म्हणजेच नेत्याची सेवा करावी लागते. हा झाला राजकारणी उद्योग. वरिष्ठांच्या नजरेत हा तुमचा धंदा बसला की तुमची जी काही भरभराट होते ती विचारू नका. चाळीस पन्नास रुपयांची पायात स्लीपर घालणारा तो पाच हजाराची चप्पल घालून कधी फिरायला लागतो हे कोणालाच कळत नाही. हे फक्त एक छोटेसे उदाहरण. राजकीय उद्योगातील प्रगतीच्या आलेखाची उदाहरणे द्यायची वेळ आली तर कमीत कमी पी. एच. डी. चा एक थिसिस तयार होईल. असो.

गणपतराव देशमुख साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून भविष्यातील किती राजकारणी चालतील हीच मोठी शंका आहे. पुढील दोन तीन दशके राजकारणात अशा व्यक्तींचा दुष्काळ असेल हे मात्र शंभर टक्के सत्य आहे. राजकीय क्षेत्रातील 95 टक्के नेते, कार्यकर्ते हे फक्त पैसे आणि टक्केवारीचा हिशोब करीतच काम करीत असतात (The workers are only calculating the money and the percentage).

आम्हीही अशी थप्पड देऊ की समोरील व्यक्ती आपल्या पायांवर पुनः उभी राहू शकणार नाही’, उद्धव ठाकरे

11-time MLA Ganpatrao Deshmukh cremated with state honours

राजकीय क्षेत्राबरोबरच प्रशासकीय यंत्रणेत सुद्धा हीच बोंब आहे. प्रत्येक प्रशासकीय अधिकारी आपल्या खुर्चीचा जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल याच विचारात त्याचे कर्तव्य पार पाडीत असतो. निस्वार्थी भावनेने काम करणारे फारच कमी आहेत. प्रत्येकजण “हात मारण्याच्या” मनोवृत्तीने काम करीत असतो.

एमपीएससी यूपीएससीच्या उमेदवारांची मुलाखतीमधील उत्तरे जर आपण पाहिली तर असे वाटते की आता आपल्या देशाला, राज्याला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सुजलाम सुफलाम होण्याला आता काही काळच बाकी आहे. मिस वर्ल्ड, मिस इंडिया या स्पर्धेत स्पर्धक जी धांदात खोटे आणि पुस्तकी उत्तरे देतात अगदी तशीच उत्तरे हे उमेदवार त्यांच्या मुलाखतीमध्ये देतात. त्यांनी दिलेल्या उत्तरात आणि पुढे व्यावहारिक जगात या अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीत जमीन-अस्मानाचा फरक असतो (There is a stark difference in the behavior of these officials in the world).

Maharashtra: 11-time MLA Ganpatrao Deshmukh cremated with full state honours

एमपीएससी यूपीएससीच्या मुलाखती घेणाऱ्या पॅनेलवाल्यांना आमची एक नम्र विनंती आहे, जर मुलाखतीत तुम्ही असा प्रश्न विचारणार असाल की, तुम्ही प्रशासकीय सेवेत कशाला येत आहात? आणि जर त्या उमेदवाराने उत्तर दिले की तो जनतेच्या सेवेसाठी, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रशासकीय सेवेत येत आहे तर अशी उत्तरे देणाऱ्याला सरळ शून्य गुण देऊन टाका. खोटारडे आहेत ते सगळे. मी पैसे खाण्यासाठी प्रशासकीय सेवा जॉईन करीत आहे असे सांगणाऱ्या उमेदवाराला गुण द्या. किमान तो खरे तरी बोलत आहे (At least he telling the truth).

Ganapatrao Deshmukh were able to set this political record
गणपतराव देशमुख

आमचे इतक्या वर्षात ठाम मत झाले आहे की, वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट असेल तर त्याच्या हाताखाली काम करणारे 90% अधिकारी-कर्मचारी हे भ्रष्ट असतात. त्यांच्या मनात असो अथवा नसो. देशाचा, राज्याचा सत्यानाश व्हायला हे आयएएस, आयपीएस आणि तत्सम सुपर क्लास वन अधिकारी जबाबदार आहेत. उदाहरणार्थ एका परमवीरसिंगमुळे त्याच्या हाताखालचे कसे भ्रष्ट होतात याचे हे ताजे उदाहरण आहे.

आज-काल प्रत्येकाला पैसे हवे आहेत. सरकारी नोकरी म्हणजे पगारापेक्षा जास्त मिळालेच पाहिजे आणि तो माझा जन्मसिद्ध हक्कच आहे अशा थाटात नोकऱ्या केल्या जातात. मी शेंगा खाल्ल्या नाहीत त्यामुळे टरफले उचलणार नाही अशा थाटातच पगाराच्या वर एक्स्ट्रा पाकीट मिळाल्याशिवाय मी काम करणारच नाही अशीच सगळ्यांची गत झाली आहे. असो.

आजकाल भिकारी सुद्धा एक दोन रुपये भिक घेत नाही. त्याला कमीत कमी पाच रुपये हवे असतात. सध्याची सामाजिक व्यवस्था जर अशी झाली असेल तर कोणाकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात?

Ganapatrao Deshmukh were able to set this political record
गणपतराव देशमुख

पोलीस खात्यातील प्रत्येक वरिष्ठ त्याच्या हाताखाली लोकांना गुलाम समजत असतो. आयपीएसची मानसिकता ही राजाची आणि त्याच्या खालचे सर्व अधिकारी, कर्मचारी हे त्याचे गुलामच आहेत या भावनेतून ते काम करीत असतात. त्यांना वाटते की त्यांच्या हाताखालचे सर्व भ्रष्ट आणि तेच तेवढे प्रामाणिक. हे बडे अधिकारी त्यांच्या घरी शिपायांना नोकरासारखी वागणूक देतात. त्यांचे हे सर्व लाड कायदेशीररित्या बंद झालेच पाहीजेत. त्यांचे अधिकार कमी केल्याशिवाय भ्रष्टाचार कमी होणार नाही.

सगळ्याच खात्यात अशी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत बरे. हमाम मे सब नंगे. पकडला तो चोर बाकी सगळे साव. त्यामुळे साजूक तुपातील बिर्याणी बाहेर आली म्हणून कोणी उड्या मारू नये. प्रत्येकाची बिर्याणी आणि श्रीखंड पुरी ही एक ना एक दिवस बाहेर येणारच आहे. त्यामुळे रयतेच्या हिताला प्राधान्य देऊन काम करा हीच खरी प्रशासकीय सेवा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी