35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेने नारायण राणेंना अटक केल्यामुळे शिवसेनेने एकप्रकारे राणेंना मदतच केली आहे असे नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे म्हणाले (Nilesh Rane said that ShivSena has helped Rane in one way by arresting him).

मंगळवारी संपूर्ण सेना कामाला लागली आणि त्याच्यामुळे नारायण राणेंचा फायदा झाला असे म्हणत निलेश राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. सेनेने जे टोकाचे प्रयत्न केले त्यामुळे नारायण राणे फार काळ कोठडीत राहिले नाहीत.

‘पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत’

‘निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार’

Nilesh
शिवसेनेने नारायण राणेंना अटक केल्यामुळे शिवसेनेने एकप्रकारे राणेंना मदतच केली आहे

त्यांना त्याच दिवशी जामीन मिळाला असे सांगत निलेश राणेंनी सरकारची औकात काढली आहे.मंगळवारी मुख्यमंत्र्यांना कानाखाली वाजवण्याच्या नारायण राणेंच्या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

नारायण राणेंना अटक झाली व त्याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका सुद्धा झाली. नारायण राणेंची सुटका झाल्यामुळे चिरंजीव निलेश राणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.

ठाकरे सरकारला उठलाय पोटसुळ : प्रविण दरेकर

Police Arrived To Arrest Union Minister Narayan Rane While He Was Having Lunch. Video Surfaces

शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राणेंच्या अटकेसाठी अनेक प्रयत्न करूनही राणेंचे शिवसेना काही वाकडे करू शकली नाही अशा आशयाचे ट्विट करत निलेश राणेंनी आपले मत ट्विटच्या माध्यमातून मांडले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी