31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयठाकरे सरकारला उठलाय पोटसुळ : प्रविण दरेकर

ठाकरे सरकारला उठलाय पोटसुळ : प्रविण दरेकर

टीम लय भारी

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने महाविकास आघाडी सरकारला उठलेला पोटसुळ ह्या कारवाईच्या माध्यमातून दिसून येतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी रत्नागिरी येथे दिली (Praveen Darekar first reaction after Narayan Rane arrest).

मुंबईतून रत्नागिरी येथे तातडीने दाखल झालेले दरेकर म्हणाले की, कोणत्याही गुन्ह्याला घाबरणारा भाजप पक्षाचा कार्यकर्ता नाही. जन आर्शिवाद यात्रा ताकदीने सुरू असून यात्रेला लोकांचा भरभरून आर्शिवाद देखील मिळत आहे. आजची बेकायदेशीर कारवाई म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा राणे यांना कुठे तरी अडकवण्याचा डाव आहे. त्यामुळे एकाच वेळेला तीन चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका

नारायण राणे ‘कोंबडी चोर’ शिवसेनेची पोस्टरबाजी

नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागेल असे वाटण्याचे कारण नाही. राणे यांना महाड न्यायालयात नेल्यानंतर तेथील निकालानुसार राणे यांना जामीन मंजुर झाला. त्यांची प्रकृती ठिक असेल तर जन आर्शिवाद यात्रेस पुन्हा सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते दरेकर यांनी रत्नागिरी विश्रामगृह येथे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे (Praveen Darekar while talking to media at Ratnagiri Rest House).

Praveen Darekar reaction after Narayan Rane arrest
नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले

शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

20-Year Record: Cabinet Minister N Rane Arrested For “Slap Thackeray”

महाड न्यायालायत राणे यांच्या बाजूने निकाल लागला तरी नाशिक मधील दाखल केलेल्या एफआयरनुसार त्यांना पुन्हा अटक करण्यात येईल, आपल्याला भीती वाटत असल्याचे सांगताना दरेकर म्हणाले. ही सर्व बेकायदेशीर कारवाई पाहता. सरकारच्या मनात किती पाप आहे हे यातुन दिसुन येते. सरकराने नियोजन करून केलेला हा कट आहे. तसेच उदया दुदैर्वाने राणे यांची प्रकृतीला काही झाले तर याला महाविकास आघाडी सरकार आणि पोलिस प्रशासन जबाबदार राहिल असे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे (This is a planning plan made by Praveen Darekar government).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी