32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजअखेर नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

अखेर नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : बुधवार दि. ९ फेब्रुवारी रोजी भाजपा आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणी अखेर जामीन मंजूर झाला आहे(Nitesh rane granted bail from session court).

तारीख पे तारीख देत नितेश राणे यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढत जाणार असल्याचं समजलं जात होतं. पण आता मात्र या प्रकरणी आता अखेर जमीन मंजूर झाला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी (९ फेब्रुवारी) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. अवघ्या ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. नितेश राणे यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मिळाला आहे.

मंगळवारी (८ फेब्रुवारी) जामीन मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांचे वकिल, जेष्ठविधीतज्ज्ञ सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत, वकील साळवी यांनी युक्तिवाद केला होता. आणि याच दोन्ही बाजूच्या युक्तिवादावर आज अखेर सुनावणी झाली. त्यानंतर आज निर्णय देतो असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज यावर जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला.

हे सुद्धा वाचा

नितेश राणे यांना दिपक केसरकर यांचा टोला, ‘नाहीतर पुन्हा जेलमध्ये जावे लागेल’

नितेश राणे यांना खोडसाळ प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता, राणेंच्या वकिलांचा दावा

‘तारीख पे तारीख’ देत नितेश राणेंचा कोठडीतला मुक्काम वाढला!

Nitesh Rane surrenders before court in attempt to murder case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी