32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजनितेश राणेंच्या अडचणीत वाढ, जिल्हा सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, जिल्हा सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर 24 तासांतच राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी नियमित जामिसाठी अर्ज केला असून, त्यांना जामीन मिळणार की अटक होणार याचा फैसला आज होणार आहे(Nitesh Rane’s difficulty, hearing in District Sessions Court today).

राणेंना शरण येण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला असल्याचे त्यांना अटकेपासूनही संरक्षण आहे, असे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, त्यांचे स्वीय सहाय्यक कणकवली पोलिसांसमोर शरण आले आहेत(Nitesh Rane was given ten days to surrender).

सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायलयात धाव घेतली. चार दिवसापूर्वी नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. मात्र त्यावेळी सरकारी वकील अनुपस्थित राहिल्याने ती सुनावणी आज होणार आहे. नितेश राणे यांच्या बाजूने अॅड. सतीश मानशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. तर, सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांचे म्हणणे कोर्टाने मागवले होते. संतोष परब हल्लाप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांना नितेश राणेंची कोठडी हवी आहे. याप्रकरणी सरकारी वकील आणि पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालय निर्णय देणार आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वोच्च न्यायालयाचा नितेश राणेंना दणका

मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला

मुंबई महापालिकेचं डिपॉझिट तोडून शेतकऱ्यांना मदत द्या : नितेश राणे

‘Surrender and seek bail’: Nitesh Rane gets 10-day arrest shield from SC

नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे आज सकाळी कणकवली पोलिसांसमोर शरण आले. संतोष परब हल्ला प्रकरणात राकेश परब हे आरोपी आहेत. या प्रकरणी सचिन सातपुते याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. सातपुते यानेच संतोष परबवर हल्ला केला होता. .या सातपुतेच्या संपर्कात नितेश राणे सातत्याने होते, असा पोलिसांचा आरोप आहे. राणे हे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्याच माध्यमातून सातपुतेशी संपर्क साधत होते, असाही पोलिसांचा दावा आहे. आता राकेश परब हे पोलिसांसमोर हजर झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने 17 जानेवारीला फेटाळला होता. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी