फोटो गॅलरी

PHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर….

मराठी सिनेसृष्टीतील टाइमपास, नटरंग, बालक-पालक, या गाजलेल्या चित्रपटांचा प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव याने पत्नी मेघना जाधव सोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. 5 डिसेंबर 1998 मध्ये रवी आणि मेघना यांचं लग्न झालं होते, आणि आता लग्नाच्या 24 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांनी पुन्हा एकदा सप्तवचन घेतले आहेत.

नेहमीचं आपल्या चित्रपटांसाठी चर्चेत असलेला रवी जाधव सध्या एका फोटोमुळे चांगलाच चर्चेत आहे. या फोटोमध्ये रवी आणि मेघना हे वेडिंग लूकमध्ये असून सप्तपदी घेताना दिसत आहेत.

वायरल होणारा हा फोटो मेघना जाधवने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या लग्नाच्या 24 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेघनाने हा फोटो शेअर केला आहे.

फोटोला एक सुंदरस कॅप्शन सुद्धा मेघनानं दिलं आहे, “आमच्या लग्नाचा 24 वा वाढदिवस आहे. आम्ही 1992 मध्ये भेटलो आणि 1998 मध्ये लग्न केले. अनमोल क्षणांनी भरलेला हा प्रवास पुढे असाच चालू राहिल”

हे सुद्धा वाया

बिगबॉस फेम दिव्या अग्रवालची अपूर्व पाडगावकरसोबत एंगेजमेंट

अक्षय कुमारने शेअर केला छत्रपती शिवरायांच्या भुमिकेतील फर्स्ट लूक, पाहा खास झलक

PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.

मेघनाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे यांनी सुद्धा कमेंट करुन मेघना आणि रवी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सध्या रवी त्याचा हिंदी चित्रपट ताली साठी सुद्धा चर्चेत आहे. या आगामी चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा पोस्टर प्रकाशित झाला असून प्रेक्षक चित्रपटाची देखील उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Roshani Vartak

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

3 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

4 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

6 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

6 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

6 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

7 hours ago