25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमनोरंजनअक्षय कुमारने शेअर केला छत्रपती शिवरायांच्या भुमिकेतील फर्स्ट लूक, पाहा खास झलक

अक्षय कुमारने शेअर केला छत्रपती शिवरायांच्या भुमिकेतील फर्स्ट लूक, पाहा खास झलक

अक्षय कुमारने मंगळवारी (6 डिसेंबर) 'वेडात मराठे वीर दौडले सात' या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटात खिलाडी कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अक्षय कुमारने मंगळवारी (6 डिसेंबर) ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटात खिलाडी कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान केलेला एक नवीन व्हिडिओ अक्षयने शेअर केला आहे, ज्यात मुंबईत चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलची सुरुवात झाल्याची घोषणा त्याने केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या कास्टची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी अक्षयच्या भक्षुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, आथा अक्षयच्या चाहत्यांना त्याची या भुमिकेतील पहिली झलक चांगलीच आवडल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने सेटवरील त्याच्या पहिल्या दिवसाबद्दल एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रासमोर हात जोडून पोज दिली. यासोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज मी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाचे शूटिंग सुरू करत आहे, ज्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे.” त्यांच्या जीवनातून आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने प्रेरणा घेऊन मी माझ्या परीने प्रयत्न करेन. तुमचे आशीर्वाद सोबत असूद्यात. असे भावनिक कॅप्शन लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची; सुनावणी आता पुढल्या वर्षीच !

‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय पण फायदा मात्र टीम इंडियाला, वाचा संपूर्ण समीकरण

अक्षयने आणखी एक पोस्ट देखील शेअर केली ज्यामध्ये त्याने सेटवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आपला पूर्ण गेटअप दर्शविला आहे. इंस्टाग्राम रील्सवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये, अक्षय कॅमेर्‍याकडे चालताना दिसत आहे, तर पार्श्वभूमीत ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषवाक्य असलेले एक आकर्षक गाणे वाजत आहे. त्यानी त्याच्या पोस्टला ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे कॅप्शनही दिले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

चित्रपट कधी आणि किती भाषांमध्ये प्रदर्शित होणार?
या मराठी चित्रपटात जय दुधने, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. वसीम कुरेशी निर्मित वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी