27 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमनोरंजनबिगबॉस फेम दिव्या अग्रवालची अपूर्व पाडगावकरसोबत एंगेजमेंट

बिगबॉस फेम दिव्या अग्रवालची अपूर्व पाडगावकरसोबत एंगेजमेंट

बिग बॉस फेम अभिनेत्री दिव्या अग्रवाल लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. नुकतीच ती आपल्या 30 व्या वाढदिवसानिमित्त आपला बॉयफ्रेन्ड अपुर्व पाडगावकर सोबत दिसून आली होती. तीने अपुर्वसोबतच्या नात्याला दुजोरा दिला आहे. दिव्याला अपूर्वने एकदम सिनेस्टाईल प्रपोज केले आहे. दिव्या अग्रवालने अपूर्व सोबत साखरपूडा देखील केला आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री दिव्या अग्रवाल लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. दिव्याने आपल्या नात्याबद्द्ल आपल्या चाहत्यांना मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दिव्या अग्रवाल हि प्रियांक शर्मा तसेच वरुण सुद सोबत रिलेशनशिपमध्ये होती. वरुण सुद सोबत काही वर्षे दोघे एकमेकांना डेट सुद्धा करत होते. मात्र नऊ महिन्यांपूर्वी वरुण सुद सोबत ब्रेकअप झाला होता. त्यानंतर नुकतीच ती आपल्या 30 व्या वाढदिवसानिमित्त आपला बॉयफ्रेन्ड अपुर्व पाडगावकर सोबत दिसून आली होती.

दिव्याने सोमवारी आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर तीने अपुर्वसोबतच्या नात्याला दुजोरा दिला आहे. दिव्याला अपूर्वने एकदम सिनेस्टाईल प्रपोज केले आहे. दिव्या अग्रवालने अपूर्व सोबत साखरपूडा देखील केला आहे. या फोटोमध्ये दिव्या अग्रवाल आणि अपूर्व एँगेजमेंट रिंग घालतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अतिशय रोमॅँटिक अशा पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये दिव्या दिसत आहे. त्यावर ” मी कधी हसणे थांबवू शकते का? कदाचित नाही. मला हा प्रवास शेअर करण्यासाठी खुपच चांगली वेळ मिळाली आहे. त्यांची बायको हे कायमचे वचन. या दिवसापासून मी यापुढे कधी एकटी प्रवास करणार नाही.” असे भन्नाट कॅप्शन देखील तीने लिहीले आहे.

अपूर्व पाडगावकर हा बिझनेसमेन असून त्याच्या मालकीची मुंबईमध्ये अनेक रेस्टॉ़रंट आहेत. अपूर्व पाडगावकर यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले असून त्याने एमबीए देखील केले आहे. अपूर्व पाडगावकर सोशल मीडियावर देखील खुप अक्टिव असतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक चाहते आहेत. दरम्यान अपूर्व आणि दिव्याच्या एंगेजमेंटनंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी दोघांनाही खुप शुभेच्छा दिल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
अक्षय कुमारने शेअर केला छत्रपती शिवरायांच्या भुमिकेतील फर्स्ट लूक, पाहा खास झलक
शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची; सुनावणी आता पुढल्या वर्षीच !
‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

दोघांच्या एंगेजमेंट नंतर अपूर्व आणि दिव्याचा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्व दिव्याला म्हणतो की, फक्त कुटुंबाने ही परवानगी दिली आहे. आता या कुटुंबाचा हिस्सा बनू शकतो का असे मी तुला विचारू शकतो का? ही मला कोको म्हणून बोलविते. तुला कोकोची बायको व्हायला आवडेल का? एवढे बोलून अपूर्व गुडघ्यावर बसतो. तेवढ्यात दिव्या त्याला उठवत डोके हलवून होकार दर्शविते. त्यानंतर ते दोघे एकमेकांना अलिंगन देतानाचा हा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!