फोटो गॅलरी

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन… असा आहे जुही चावलाचा प्रवास

90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत जुही चावलाचे नाव नेहमी आघाडीवर येते. शाहरुख खान, आमिर खान, ऋषी कपूर आणि अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या जुही चावलाने आपल्या अभिनयाच्या आणि सुंदरतेच्या जोरावर सर्व प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री जुही चावला 13 नोव्हेंबरला तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण तिच्या करिअरबद्दल जाणून घेऊया….जूही चावलाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. तिने चित्रपटात येण्यापूर्वी 1984 मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावला होता.

त्याचवेळी जुहीने 1986 मध्ये ‘सलतनत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. जुही चावलाचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर जुही दक्षिण चित्रपट सृष्टीकडे वळली. साऊथचे काही चित्रपट केल्यानंतर जुही पुन्हा बॉलिवूडमध्ये आली.

हे सुद्धा वाचा

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

Mumbai News : मुंबईत पाळीव कुत्रे फिरवणाऱ्यांनी सावधान !

Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रीचा आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ 15 ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित

1988 मध्ये आलेला ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट जुही चावलाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील जुही चावलाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले, तर याच चित्रपटाने जुहीला रातोरात स्टार बनवले.

‘आयना’, ‘हम हैं राही प्यार के’ आणि ‘डर’ हे चित्रपट जुही चावलाच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट मानले जातात.

जुही चावलाने शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, ऋषी कपूर आणि अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असले तरी आमिर खानसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना सर्वाधिक आवडली होती.

1995 मध्ये जुहीने उद्योगपती जय मेहतासोबत लग्न केले. पतीच्या जास्त वयामुळे जुहीला अनेक वेळा ट्रोल ही करण्यात आले आहे. परंतु जुहीने हे सिद्ध केले आहे की एकमेकांवर जर प्रेम असेल आणि दोघांमध्ये ती समज असेल तर दोन व्यक्तींंमध्ये असलेल्या वयाने काहीही फरक पडत नाही.

90 च्या दशकात चित्रपटांमध्ये हिट असणारी जुही अभिनेत्री असण्यासोबतच एक बिझनेस वुमन देखील आहे. जुहीला  जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. सर्वांना आवडणारी ही अभिनेत्री रविवारी 13 नोव्हेंबरला तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.

 

 

 

 

टीम लय भारी

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

8 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

8 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

8 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

8 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

9 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

9 hours ago