31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमुंबई महापालिकेने उंदीर मारण्यातही केला घोटाळा, प्रभाकर शिंदेंचा आरोप

मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यातही केला घोटाळा, प्रभाकर शिंदेंचा आरोप

टीम लय भारी

मुंबई : मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला सध्या समोर आला आहे. आणि घोटाळ्याचे बीज भाजपनं स्थायी समितीने समोर आणले आहे. असा गंभीर आरोप भाजप स्थायी समितीचा मुंबई मुंबईमहापालिकेवर करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट करण्यात येत असतो. असा उंदिर मारण्याबाबतचा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 1 कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे(Prabhakar Shinde’s allegation, BMC committed a scam in killing rats too).

त्यावर प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे की, एक उंदिर मारण्यासाठी 20 रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास 22 रुपये या दराने उंदिर मारण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. पालिकेने केवळ 5 वॉर्डमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदिर मारले याचा आकडा पालिकेने दिलेला नाही, असा आरोप केला आहे.

आणि उंदरांच्या उत्पतीची कारणे कोणती ती सुद्धा यात दिलेली नाहीत, मग यांनी नक्कीच उंदिर मारले का ? असा शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे की, याविषयी सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश करण्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहे.

हे सुद्धा वाचा 

आता गाठ माझ्याशी! भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक

शेतकरी जोडप्याला मारहाण करणाऱ्या ‘या’ राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल!

Mumbai: BJP opposes BMC’s cost variation in construction of Vikhroli flyover bridge

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी