34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाडांचा आण्णा हजारेंना टोमणा; ट्विटवरून केली टीका

जितेंद्र आव्हाडांचा आण्णा हजारेंना टोमणा; ट्विटवरून केली टीका

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांचा आज वाढदिवस आहे. अण्णा हजारे (Anna Hazare) यांना अनेक राजकीय नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अण्णा हजारे आणि आंदोलन हे समीकरण फार मिळत जूळत आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंना टोमणा लगावला आहे (Jitendra Awhad has taunted Anna Hazare).

तत्कालीन यूपीए सरकार असतांना अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी अनेक आंदोलने केली. महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी हे त्यांच्या आंदोलनाचे मुख्य विषय होते. जंतर-मंतर वर त्यांनी केलेल्या उपोषणामुळे काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर भाजपा सेत्तेत आल्यानंतर आण्णांची (Anna) भुमिका बदलली का? अशी टीका त्यांच्यावर सतत होत असते. तसेच, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अण्णा हजारे (Anna Hazare) यांना चिमटा घेत शुभेच्छा दिल्या.

राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी संघटना आक्रमक, उद्यापासून महिनाभर आंदोलन

कोरोनाच्या नियमांचे पालन करून आंदोलन होणार, संभाजीराजेंचं आवाहन

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “प्रिय अण्णा…. प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांबद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता #HappyBirthdayAnna”

या शुभेच्छा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सतत सामाजिक प्रश्नांवर आंदोलनाचे ह्त्यार उपसणारे अण्णा हजारे (Anna Hazare) आता गप्प का, असे लक्षात आणून देण्याचे काम जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अप्रत्यक्षरीत्या केले आहे.

Red alert issued in two Karnataka districts as heavy rain hits some parts

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले. पेट्रोलचे दर देखील गगनाला भिडले आहेत.त्यामुळे विरोधी नेते केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपावर टीका करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी