34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeराजकीयPravin Darekar : प्रविण दरेकरांची संजय राऊतांसह काँग्रेस-शिवसेनेवर सडकून टीका

Pravin Darekar : प्रविण दरेकरांची संजय राऊतांसह काँग्रेस-शिवसेनेवर सडकून टीका

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेस-शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली (Pravin Darekar criticizes Congress-Shiv Sena along with Sanjay Raut) आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत बोलतात. मात्र महाराष्ट्राच्या कानाकोप-यात बलात्कार होतात. त्या ठिकाणी बोलघेवडे संजय राऊत गेले का कधी? आता म्हणतात राष्ट्रपती राजवट लावा. ना प्रतिक्रिया ना भेट, केवळ राजकारण करण्यासाठी यांना वेळ आहे. त्यांना लोकांचे काही घेणे देणे नाही. जनतेला ठाऊक आहे की राजकारण कोण करतेय आणि काम कोण करतेय, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं पाहायचं वाकून… ही कुठली मानसिकता

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता आहे. इथले अनेक मुद्दे आम्ही मांडले. हाथरस येथे जे घडले ते निंदनीय आहे. जे घडले त्याबद्दल सत्ताधारी गृहमंत्री काही बोलत नाही. महाराष्ट्रात ज्या बलात्काराच्या घटना घडतायत त्यावर बोलत नाहीत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याचं पाहायचं वाकून, ही कुठली मानसिकता आहे.

काँग्रेस-शिवसेनेने किती स्वैराचार करावा, हाच खरा प्रश्न

मनपाच्या स्थायी समितीसाठी काँग्रेस शिवसेनेत चुरस आहे, तर राज्यातील सरकारमध्ये ते एकमेकांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांनी किती स्वैराचार करावा हाच मूळ प्रश्न असल्याचा घणाघात प्रविण दरेकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेच्या अशा दुटप्पी वागण्याचा उबग आल्याचेही म्हटले.

दरेकर म्हणाले, ‘मनपात स्थायी समितीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत चुरस आहे. मात्र, राज्यात ते एकमेकांसोबत सरकारमध्ये आहेत हे काही पटत नाही. किती स्वैराचार करायचा हाच मूळ प्रश्न आहे. महाविकास आघाडीत मतभेद आहेत. एकमेकांविरोधात मतदान केले, तर निकाल विरोधात लागू शकतो. हे सरकार अंतर्गत विरोधाने पडेल असे वाटते. महाराष्ट्राच्या जनतेला यांच्या अशा वागण्याने उबग आलाय. एकमताने निर्णय झालाय असा एक दिवस सांगा.’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी