30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईबिल्डर व दारू विक्रेत्यांच्या भल्याचा विचार करणारे आघाडी सरकार पोलिसांचा भल्याचा विचार...

बिल्डर व दारू विक्रेत्यांच्या भल्याचा विचार करणारे आघाडी सरकार पोलिसांचा भल्याचा विचार कधी करणार, प्रविण दरेकर यांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई : पोलिसांचे पगार अतिशय कमी असतानाही ते कसा बसा आपला संसार चालवित आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबईवरील प्रत्येक संकटाला सोमोरे (Pravin Darekar) जाऊन पोलिस बांधव मुंबईकरांचे रक्षण करीत आहेत. या पोलिस बांधवाला हक्काचे घर मोफत देण्याएवजी महाविकास आघाडीचे सरकार पोलिसांकडून घरांसाठी ५० लाख रुपये मागत आहे.(Pravin Darekar question to the state government)

बिल्डरांच्या व दारू विक्रेत्यांच्या भल्याचा विचार करणार हे सरकार पोलिस बांधवांच्या भल्याचा विचार कधी करणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सरकारला केला.बीडीडी चाळ पुनर्वसनात पोलिसांना हक्काची मोफत घरे द्या या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार कालिदास कोळंबकर (Pravin Darekar) यांनी आजपासून लाक्षणिक आंदोलन पुकारले आहे.

वडाळा येथे सुरु केलेल्या या लाक्षणिक आंदोलनाच्या ठिकाणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली व त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितले की, बिल्डरांची काळजी घेण्यापेक्षा किंवा बिल्डरांचे साटेलोटे करण्यापेक्षा पोलिसांसाठी पुण्याची कामे सरकारने करावीत.

दारु विक्रेत्यांच्या परवान्यामध्ये सुट दिली जाते. बिल्डरांना स्टॅम्प डुयटी माफ केली जाते. त्यांच्या भल्यासाठी करोडो रुपये माफ करतात तेव्हा सरकारच्या तिजोरीवर ताण येत नाही का. पण कष्टकरी पोलिसांच्या घरासाठी सरकारच्या (Pravin Darekar) तिजोरीवर ताण कसा येतो. हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही.

बीडीडी चाळीतील पोलिस बांधवांना मोफत घर मिळाले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. आज आमदार कालिदास कोळंबकर यांनी लाक्षणिक उपोषण करुन या आंदोलनाची सुरुवात केली आहे. उद्या हे आंदोलन अधिक तीव्र झाले तर त्याला महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असेल असा इशारा प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिला.

हे सुद्धा वाचा :- 

Mumbai police files chargesheet against BJP leader Pravin Darekar, 2 others

गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं! : रोहित पवार

विलासराव देशमुखांचा ठाम विश्वास, कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी