31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय‘म्युकरमायकोसिस’ बाबत प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

‘म्युकरमायकोसिस’ बाबत प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाचे संकट असतानाच आता म्युकरमायकोसिस (Myocardial infarction) (ब्लॅक फंगस) या आजाराने देखील डोकं वर काढलं असून, या आजाराचे रूग्ण देखील आढळून येत आहेत. देशातील कोरोना परिस्थितीवरून प्रत्येकवेळी मोदी सरकारवर निशाणा साधणाऱ्या काँग्रेसकडून, आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) वरूनही टिप्पणी केली जात आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ‘जबाबदार कोण’ ही मोहीम केंद्र सरकारविरोधात सुरू केलेली आहे. याच दरम्यान त्यांनी आता पंतप्रधान मोदींना म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) उपचाराचा आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेत समावेश करावा, तसेच, यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा रूग्णांना मोफत पुरवठा केला जावा. अशी मागणी केली आहे. प्रियंका गांधींनी या संदर्भात केलेल्या ट्विटसोबत पंतप्रधान मोदींच्या नावे एक पत्र देखील जोडलेले आहे.

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल राज्य सरकारकडे सादर

लॉकडाउनच्या गोंधळावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Provide black fungus injections to people for free, Priyanka Gandhi appeals to PM Modi

“म्युकरमायकोसिस (Mucormycosis) च्या इंजेक्शनची मोठ्याप्रमाणावर मागणी सुरू आहे. जगभरात औषध पुरवठा करूनही आपल्याला या संकटात वेळोवेळी औषध तुटवडा भासत आहे. जबाबदार कोण आहे? इंजेक्शन महागडे आहे, आयुष्मान योजनेत कवर होत नाही. पंतप्रधान मोदी, कृपया या दिशेने तातडीने पावले उचलावी.” असे प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi) आपल्या पत्रात म्हटले आहे की, “देशात म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे, परंतु या आजारात मिळणारे इंजेक्शन सहज उपलब्ध होत नाही. मोठ्यांसंख्येने लोक या या औषधासाठी मागणी करत आहेत. अशातच इंदुरमधील एका मुलीचा तिच्या वडिलांसाठी इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी करणारा व्हिडिओ पाहून सर्वांना अतिशय दुःख झाले. नुकतीच दिल्लीत लष्कराच्या दोन रूग्णालयांमध्ये दाखल असलेल्या सैनिकांवर उपचार करताना म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) उपचारात वापरल्या जाणाऱ्या या इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली.”

“काळाची गरज आहे की या संबंधी आपण त्वरीत निर्णय घ्यावा, जेणेकरून लोकांचा जीव वाचवता येईल. या आजाराबाबत तुमच्या सरकारचे धोरण यांच्या गंभीरतेला अनुरूप राहिलेले नाही. रूग्ण संख्येच्या तुलनेत राज्यांना उपलब्ध करून दिलेल्या इंजेक्शनची संख्यात अतिशय कमी आहे. देशात २२ मे पर्यंत या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या ८८४८ सांगण्यात आली होती. यानंतर २५ मे रोजी रूग्ण संख्या वाढून ११ हजार ७१७ झाली. केवळ तीन दिवसांत २ हजार ८६९ रूग्ण वाढले. म्युकरमायकोसिस (Myocardial infarction) सारखा आजार ज्यामध्ये ५० टक्के मृत्यू दर असतो. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्युकरमायकोसिसच्या (Myocardial infarction) उपचारावरच लाखो रुपयांचा खर्च येत आहे. यावरील इंजेक्शन अद्याप आयुष्मान योजने अंतर्गत देखील कवर होत नाही. माझा तुम्हाला आग्रह आहे की, या आजारावरील उपचाराला आयुष्मान योजनेच्या कक्षात आणले जावे किंवा याचा इंजेक्शन पुरवठा रूग्णांना मोफत केला जावा.” अशी देखील प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मागणी केली आहे.

राज्यात करोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस (Mucormycosis) अर्थात काळी बुरशीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने म्युकरमायकोसिसला (Mucormycosis) साथरोग कायद्यांतर्गत साथीचा रोग म्हणून समाविष्ट केले असून त्यानुसार निदानपद्धती आणि उपचारपद्धतींसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आता राज्य सरकारला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यभरात म्युकरमायकोसिसवर (Mucormycosis) उपचार देणाऱ्या रुग्णालयांना या आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिले आहेत. निश्चित दरांपेक्षा जास्त दर कोणत्याही रुग्णालयाला आकारता येणार नाहीत.

२५ मे नंतर केंद्र सरकारने म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची संख्या का सांगितली नाही?

काय कारण आहे की २५ मे नंतर केंद्र सरकारने म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रूग्णांची संख्या सांगितलेली नाही. उलट, केंद्र सरकार राज्यांना किती इंजेक्शन पाठवत आहे, याची माहिती सातत्याने सार्वजनिक करत आहे. जर कोरोना रूग्णांची संख्या सांगितली जात आहे, तर म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रूग्णांची संख्या का नाही सांगितली जात?

माहितीमुळे जागृती निर्माण होते व लोक जागरूक होतात. या आजाराने पीडित असलेल्या रूग्ण संख्येबाबत दररोज माहिती दिली जावी. सरकारने रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या आधारावर या इंजेक्शनचे उत्पादन आणि उपलब्धता वाढवावी, जेणेकरून या गंभीर आजारानेग्रस्त असलेल्यांना देखील भटकावे लागणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी