33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयराणे कुटुंबियांची कोंबडीची दोन दुकाने, पत्नीच्या नावाने बार

राणे कुटुंबियांची कोंबडीची दोन दुकाने, पत्नीच्या नावाने बार

विमल पाटील : टीम लय भारी

मुंबई : राणे कुटुंबियांची चेंबूरमध्ये कोंबडीची दोन दुकाने आहेत. नारायण राणे यांनी सुरूवातीच्या काळात एक दुकान सुरू केले होते. कालांतराने दुसरे दुकानही सुरू केले(Rane family has two chicken shops in Chembur).

एच. एन. पोल्ट्री व चिकन शॉप असे पहिल्या दुकानाचे नाव आहे. एच म्हणजे हनुमंत परब, तर एन म्हणजे नारायण राणे. हनुमंत परब आणि नारायण राणे हे दोघे मित्र होते. त्यांनी हे कोंबडीचे दुकान सुरू केले होते. त्यानंतर राणे कुटुंबियांनी आणखी एक कोंबडीचे दुकान सुरू केले. निलेश पोल्ट्री असे या दुकानाचे नाव आहे.

 

तालिबानने अक्कल पाजळली, भारताला दिला फुकटचा सल्ला

‘निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार’

Rane family
राणे कुटुंबियांची चेंबूरमध्ये कोंबडीची दोन दुकाने आहेत

निलेश राणे यांच्या नावाने हे दुसरे दुकान आहे. चेंबूरमध्ये ही दोन्ही दुकाने आहेत.
‘नारायण राणे यांना कोंबडीचोर का म्हणतात ? ’ याबाबतचा इतिहास सांगणारा व्हिडीओ ‘लय भारी’ने तयार केला होता. या दरम्यान राणे यांची दोन कोंबडीची दुकाने असल्याची माहिती समोर आली.

चेंबूर परिसरात नारायण राणे यांचा एक बार, व तारांकीत हॉटेल सुद्धा आहे. बारचे नाव निलम असे होते. पत्नी निलम यांच्या नावाने राणे यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी हा बार सुरू केला होता. पण त्याचे नाव आता बदलून ‘कॅनॉन’ असे करण्यात आले आहे. या शिवाय निलदुर्ग नावाचे दुसरे एक रेस्टॉरण्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाघाच्या जबड्यात कोंबडी, संजय राऊतांचे ट्विट

Uddhav Thackeray’s Old Dig At Yogi Adityanath Viral Amid Narayan Rane Row

नारायण राणे यांचे अनेक बिझनेस राज्यभरात आहेत. विशेषतः कोकण व गोव्यात त्यांची हॉटेल्स आहेत. परंतु सुरूवातीच्या काळात राणे यांनी सुरू केलेली कोंबडीची दुकाने अद्यापही त्यांनी चालू ठेवली आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी