33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र'निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार'

‘निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार’

टीम लय भारी

मुंबई : मंगळवारी नारायण राणेंना अटक झाल्यानंतर कोर्ट, न्यायालयांची भाषा सर्रास नेत्यांकडून केली जात आहे. राज्यात सरकार आणि भाजप यांच्यात एकमेबद्दल असलेली सूडभावना उफाळून आलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी नारायण राणेंना जामीन मिळाल्यानंतर नीलम गोऱ्हे आणि अनिल परब यांना न्यायालयात उभे करणार असल्यासंबंधी माहितीय दिली (Chandrakant Patil informed that Neelam Gorhe and Anil Parab would be produced in court).

रात्री उशिरा नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जीभ फुटली आहे. शुल्लक कारणावरून नारायण राणेंना अटक केल्याप्रकरणी सरकारला दूषणे देतच त्यांनी जामीन मिळणे हा सत्याचा विजय असल्याचे म्हंटले आहे.

निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत, चंद्रकांत पाटीलांनी उद्धव ठाकरेंना खिजवले

Chandrakant Patil
‘निलम गोऱ्हे, अनिल परब यांना न्यायालयात खेचणार’

पोलिसांना हाताशी घेऊन भाडोत्री गुंडांचे सरकार मनमानी कारभार करत असल्याचे राणेंचे म्हणणे आहे. जेवणाच्या भरल्या ताटावरून कुणालाही ताब्यात घेणे हे अमानुषपणाचे असल्याचे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

१९ महिन्यातून अनेक वेळा न्यायालयात गेल्यावरही सरकार नीतीने वागत नाही अशी तक्रार चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचबरोबर शुल्लक चुकीवरून नारायण राणेंना अटक करण्याबाबत अनिल परब आग्रही होते असे पाटील यांचे म्हणणे आहे. वॉरंट ची वाट न बघता त्यांना अटक करावी असे म्हणणारे अनिल परब यांना कोर्टाचा रस्ता आम्ही दाखवणार आहोत असे पाटील यावेळी म्हणाले.

जयंत पाटलांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची उडवली खिल्ली

Narayan Rane’s silence during Jan Ashirwad Yatra will be powerful: Chandrakant Patil

त्याचबरोबर नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. त्या घटनात्मक पदावर आहेत. त्या राजकीय पक्षाच्या प्रवक्या असल्याप्रमाणे विधाने करत आहेत. त्यांच्याविरुद्धही आम्ही कोर्टात जाणार आहोत, असे सुद्धा चंद्राकांत पाटील म्हणाले.

या साऱ्यानंतर जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही. मात्र ती रोखण्याचा जर प्रयत्न झाला आम्ही गप्प बसणार नाही असे सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले. याच बरोबर कोकणातून शिवसेना संपली अशी धमकीही पाटील यांनी दिली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी