34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रBreaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

टीम लय भारी

मुंबई : चिपळूण व खेड परिसरातील पुर परिस्थिती चिंताग्रस्त होत चालली आहे. संकटात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आता नौदलाला (Rescue)  पाचारण करण्यात आले आहे.
नौदलाच्या सात तुकड्या पहाटे रवाना झाल्या आहेत. (Indian navy teams to rescue people stuck in flood)

महाराष्ट्र सरकारने विनंती केल्यानंतर पश्चिम किनारपट्टी नौदल सेना, मुंबई यांनी बचाव पथके तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने परिपुर्ण आणि पूर्णपणे स्वयंपूर्ण असलेल्या बोटी तसेच हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवली गेली आहेत. (Maharashtra government asks naval department for help)

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्राबरोबर परप्रांतीय उमेश कामत आरोपी, बदनामी मात्र मराठमोळ्या उमेश कामतची !

rescue
भारतीय नौसेना
Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना
बचाव मोहीम,

Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

हवामान खात्याकडून रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

प्रतिकूल वातावरणात आणि पूरग्रस्त परिस्थितीत पाण्याचा धोका असताना सुद्धा 22 जुलै रोजी नौदलाची सात पथके मुंबईहून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात रवाना झाली आहेत. प्रत्येक पथकात चार ते पाच स्वयंसेवक असून 5 पथके चिपळूण येथे रवाना झाली आहेत तर 2 पथके महाड येथे रवाना झाली आहेत. (7 rescue teams sent to raigarh and ratnagiri)

‘पोलादपूर रायगड रायगड जिल्ह्यातून विमान मार्गे मदत पोहोचवण्यात आली आहे. आयएनएस शिक्रा, मुंबई येथून एक सीकिंग 42 सी हेलो 23 जुलै 21 रोजी पहाटेच्या वेळी पोलादपूर / रायगड येथे बचावमोहिमेसाठी निघाली. 42 सी हॅलो नावाचे एक हेलिकॉप्टर मुंबईतील आय एन एस शिक्रा येथून रवाना झाले आहे तर एक हेलिकॉप्टर गोवा येथून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पोहोचले आहे.’ असे डिफेन्स विभागाचे पीआरओ मेहुल कर्णिक यांनी सांगितले.(Some trained helicopters and boats are being used to help raigad/poladpur natives)

‘चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर’

AUTO-REFRESH facebookTwitterwhatsapp Mumbai Rains LIVE Updates: House Collapse Kills 3, 5 Dead in Landslide in Maharashtra’s Raigad; Flash Floods in Telangana

 

नौदल पूरपरिस्थिती बचाव पथके (नेव्हल फ्लड रेस्क्यू टीम्स) पूर्णतः स्वयंपूर्ण आहेत. रस्सी, दोरासाहित बचावासाठी वापरले जाणारे (floats) मिथुन रबर बोट्स, लाऊड ​​हेलर्स, प्रथमोपचार किट, लाइफ जॅकेट्स आणि लाइफ बूइजसह सुसज्ज आहेत. या बचाव पथकात तज्ज्ञ नेव्हल डायव्हर्स आणि डायव्हिंग उपकरणेसुद्धा समाविष्ट आहेत. (Completely self sufficient trained teams and divers with first aid kits and life jackets are available for help)

अतिरिक्त पूर-बचाव दल मुंबईत मोठ्या प्रमाणात तयारीवर ठेवण्यात आले आहेत, त्वरित तैनात केल्यामुळेच काही वेळातच बऱ्याच पूरग्रस्तांना मदत मिळू शकेल.

https://youtu.be/Ccju9dqSFqg

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी