31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील अतिवृष्टीसाठी केंद्राकडून मदत मिळणार, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

राज्यातील अतिवृष्टीसाठी केंद्राकडून मदत मिळणार, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

टीम लय भारी

मुंबई :- संपूर्ण महाराष्ट्रात काल पावसाने थैमान घातला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. तसेच अनेक लोक बेघर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला (Prime Minister Narendra Modi called Chief Minister Uddhav Thackeray to review the situation in the state).

तसेच कोकणाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मोदींनी फोन करुन राज्यातील पूरस्थितीची माहिती घेतली. त्याचबरोबर केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सकाळपासूनच राज्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत (Chief Minister Uddhav Thackeray has also been monitoring the situation in the state since this morning).

मंत्री जयंत पाटलांनी पुरग्रस्तांच्या काळजी पोटी जागविली रात्र

हवामान खात्याकडून रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

नरेंद्र मोदी यांनी या चर्चेची माहिती मराठीत ट्विट करुन दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे”(Praying for everyone’s safety and well-being).

तसेच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील भरपावसात महाड, माणगाव परिसरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहचले. तळईपासून अर्धा तासाच्या अंतरावर ते, गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे अडकून पडले आहेत. दरेकर म्हणाले, “तळईचे ग्रामस्थ तुळशीराम पोळ यांनी गावात 25 ते 30 घरे दरड कोसळून त्याखाली आल्याची माहिती दिली आहे. यात कुणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळालेली नाही.”

Prime Minister Narendra Modi called CM Uddhav Thackeray
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे

‘चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर’

Maharashtra floods: PM Modi speaks to Uddhav Thackeray, assures all possible support

“आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी जवळच्या बिरवाडी पोलीस स्टेशनवरुन अधिकाऱ्यांना पाठवले आहे. उपजिल्हाधिकारीही जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीही एका ठिकाणी थांबलो आहोत. पाणी ओसरले नाही तर एनडीआरएफच्या बोटीतून पुढे दासगावला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईहून बिस्किट, चटई आणि पांघरुन देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत,” अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी