35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रफरदीन खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक,रितेशसह प्रिया बापट झळकणार ‘या’ चित्रपटात

फरदीन खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक,रितेशसह प्रिया बापट झळकणार ‘या’ चित्रपटात

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता फरदीन खान जवळपास ११ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तो ‘विस्फोट’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. (ritesh deshmukh, priya bapat and fardeen khan are working together after 11 years)

या चित्रपटात फरदीन खान सोबत बॉलिवूड अभिनेता रितेश देशमूख आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

भाजपाची अवस्था कळपात वाघ शिरल्यानंतर भेदरलेल्या मेंढरांसारखी

अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘विस्फोट’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘एक निर्माता म्हणून मी नेहमी एका वेगळ्या विषयाच्या शोधात असतो. आणि विस्फोट हा चित्रपट थोडा वेगळा आहे.’

विस्फोट या चित्रपटातून फरदीन खान जवळपास ११ वर्षांनंतर कमबॅक करत आहे. यापूर्वी तो २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर तो चित्रपटसृष्टीपासून लांब होता. आता तो १४ वर्षांनंतर रितेश देशमुख सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

ठाकरे सरकारवर तोफ डागत गोपीचंद पडळकरांनी दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा !

Bhushan Kumar and Sanjay Gupta back Riteish Deshmukh and Fardeen Khan starrer Visfot

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी