33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रचोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

 

टीम लय भारी
मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले. (Sadabhau khot talking about maharashtra people and their problems)

महापूर, अतिवृष्टी, कोरोनाची दुसरी लाट या सगळ्या विषयांवरून सरकार ला जबाबदार धरत सदाभाऊ खोत यांनी चीड व्यक्त केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सर्वत्र गोंधळाचे वातावरण असताना सरकारने मात्र बघ्याची भूमिका घेतली. स्वयंसेवी संघटना आणि इतर संस्था सतत मदत करत असताना मात्र सरकारकडून म्हणावी तेवढी मदत झाली नाही. असे सदाभाऊ खोत लय भारी च्या फेसबुक लाइव्ह माध्यमातून म्हणाले. (Sadabhau khot requested cm to help kokani people)

‘ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते’ – संजय राऊत

पोलीस झाले बेघर, उरला नाही कोणी वाली

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली, त्यात काही काळ गेला. त्या वेळेत दुसऱ्या लाटेचे नियोजन करावयास सरकार ला उसंत मिळाली नाही. इतर विकासकामांसाठी दिलेले 20 लाख रुग्णांच्या सेवेसाठी वापरले असते तर मराठी माणसे किड्यामुंग्यांसारखी मृत्यूपंथाला लागली नसती.

गरिबांच्या खिशाला मुख्यमंत्र्यांनी कात्री लावण्यापेक्षा ऑक्सिजन आणि रेमेडीसीविर ची सोय करावयास हवी होती. कोरोनावरची औषधे उपलब्धच नसल्याने साध्या सर्दी तापाची औषधे रुग्णांना देण्यात येत होती. कोरोनावर उपचारच नसताना 5 लाखांची बिलं तयार होत होती.

Sadabhau khot
सदाभाऊ खोत

डॉकटर्स आणि नर्सेस यांच्या अतिरिक्त भरतीची गरज असताना मात्र सरकारला त्यांच्या दीनवाण्या अवस्थेवर दया येत नव्हती. त्यावेळी कर्मचाऱ्यांना कायम न करता उलटपक्षी त्यांच्याकडून अतिरिक्त काम करून घेतले जात होते. असेही ते यावेळी म्हणाले.

सरकारी प्रताप, खोट्या स्वाक्षऱ्या करून हडपला निधी

Amid widening rift between Shiv Sena & BJP, Uddhav showers praise on Gadkari

कोरोना महामारीचे संकट उरावर असताना अतिवृष्टी आणि पूर कोकणाला छळत होता, शेतकऱ्यांपासून कोळ्यांपर्यंत सर्वांचे नुकसान झाले होते, परंतु मुख्यमंत्र्यांना कोकणवासीयांची फिकिरच नाही, अशा परिस्थितीत गांजलेल्या जनतेने कुणाकडे पाहावे? कोकणातील पीडितांचे गाऱ्हाणे मांडताना सदाभाऊ खोतांनी सरकारला प्रश्न विचारले.

दरवर्षी मुंबईतील साफसफाईच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलायला हवीत. मच्छिमारांचे नुकसान, शेकऱ्यांचे नुकसान आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांचे पोट मात्र सरकारला भ्रष्टाचारापुढे दिसत नाही, अशा शब्दात खोतांनी चीड व्यक्त केली.

या काळात महाविकास आघाडीने फक्त एकमेकांवर आरोप केले आणि त्यात कोकणातील माणूस भरडला गेला. चोर चोर मावसभाऊ अर्ध अर्ध वाटून खाऊ अशा शब्दांत सदाभाऊ खोतांनी महाविकास आघाडीवर मिश्किल टीका केली.

सदाभाऊ खोतांनी सरकार कडून काही मागण्या केल्या

1. तिसऱ्या लाटेचा विचार करून ऑक्सिजन बेड उपलब्ध करणे.

2. विकासासाठी देण्यात येणारे 20 लाख राज्याच्या पुनर्बांधणीसाठी खर्च करावेत.

3. डॉक्टर आणि नर्सेस ची नवी भरती करावी आणि जुन्या कर्मचाऱ्यांना कायम करावे.

4. मुंबईच्या स्वच्छतेच्या नावाखाली होणारा भ्रष्ट्राचार थांबवावा.

5. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना देण्यात येणारी परवानगी देऊ नये.

6. शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षांसाठी अनुदान द्यावे.

7. कोकणातील जनतेचे कर्ज माफ करावे.

8. मच्छिमारांना बोटी बांधण्यासाठी 50% अनुदान द्यावे.

9. 15 लाख रुपये मदत जाहीर करा.

10. 50% कर्जमाफी करून 50% अनुदान देण्यात यावे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी