30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईमनसे - शिवसेनेमध्ये जुंपली, 'मनसे'कडून पुन्हा आरोपांच्या फैरी

मनसे – शिवसेनेमध्ये जुंपली, ‘मनसे’कडून पुन्हा आरोपांच्या फैरी

टीम लय भारी

मुंबई : ‘युवा सेने’ने कायदेशीर नोटीस पाठविल्यानंतर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लोबोल करणारे एका मागोमाग एक चार ट्विट केले आहेत ( Sandeep Deshpande attacks on Shivsena).

मनसे - शिवसेनेमध्ये जुंपली, 'मनसे'कडून पुन्हा आरोपांच्या फैरी

‘हीच ती वेळ’ अशी ‘टॅग लाईन’ वापरून देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. हीच ती वेळ : कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची, हीच ती वेळ : मृताचा आकडा लपवून जनतेची फसवणूक करण्याची, हीच ती वेळ : स्वतःच्या हितचिंतकांना फायदा व्हावा म्हणून मान्यताप्राप्त आणि उत्तम दर्जाच्या वस्तूंना / कंपन्यांना नाकारण्याची, हीच ती वेळ : २ हजार रुपयांचा पंखा ९००० रूपये भाड्याने घेण्याची… असे ट्विट देशपांडे यांनी केले आहेत.

देशपांडे यांनी #ShameOnShivsena असा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे ( Sandeep Deshpande’s tweets ).

शवपिशव्या खरेदीमध्ये मुंबई महापालिकेने घोटाळा केला आहे, आणि त्यात युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांचा हात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर सरदेसाई यांनी देशपांडे यांना वकिलांकरवी नोटीस पाठविली होती ( Varun Sardesai sent a legal notice to Sandeep Deshpande ).

Mahavikas Aghadi

हे सुद्धा वाचा : मनसेने 48 तासांत माफी मागावी, अन्यथा… : युवा सेनेकडून ‘कायदेशीर’ इशारा

‘मनसे’ने ४८ तासांत माफी मागावी अशी मागणी या नोटीसद्वारे करण्यात आली होती. पण अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असे प्रत्युत्तर देशपांडे यांनी ट्विटद्वारे दिले होते. त्यानंतर आज पुन्हा देशपांडे यांनी चार ट्विटर करीत शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

देशपांडे यांच्या या आरोपांवर आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

MoneySpring

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी