35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयआरोपी स्वतःला वाचवण्यासाठी नेहमी इतर आरोपींची नावे घेतो : संजय राऊत

आरोपी स्वतःला वाचवण्यासाठी नेहमी इतर आरोपींची नावे घेतो : संजय राऊत

टीम लय भारी

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. या संवादामध्ये संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाया, परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात आलेले आरोप, नितेश राणे यांची अटक आणि गोवा विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं(Sanjay Raut commented on the actions of ED, Parambir Singh).

यावेळी प्रवीण राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल विचारलं असता या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई केली जाते. आम्ही त्या सहन करु , असं संजय राऊत म्हणाले. त्यांना सर्च करु द्या, मी त्यांना विचारतोय कुछ मिला क्या? हा खेळ सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.

परमबीर सिंग यांनी ईडीकडे दिलेल्या जबाबासंदर्भातही संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. परमबीरसिंग हे आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत, त्यांना जे बोलायचं ते बोलूद्यात, असं संजय राऊत म्हणाले.

“परमबीर सिंह हे आरोपी आहेत. त्यांच्या वर खंडणीपासून अपहरणापर्यंत असे अनेक गुन्हे आहेत. मनसूख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले आहेत ते मला माहिती नाही. आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतील. या आरोपांचे विरोधीपक्षाने भांडवल केले तरी याचा काही उपयोग नाही. आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव घेतले जात होते. कोण कोणाचे नाव घेतो याच्यावरुन काही बोध होत नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

परमबीरसिंग यांचा ईडीकडे धक्कादायक दावा, वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे निर्देश

गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’वर संजय राऊतांचा आक्षेप, म्हणाले ‘आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका’

भाजपाने उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नये, संजय राऊतांचा इशारा

Union Budget 2022 a ‘flop film,’ says Sanjay Raut

ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल विचारलं असता या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई केली जाते. आम्ही त्या 2024 सहन करु, असं संजय राऊत म्हणाले. त्यांना सर्च करु द्या, मी त्यांना विचारतोय कुछ मिला क्या?, हा सर्व खेळ सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.

नितेश राणे प्रकरणी बोलताना “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायद्यासंदर्भात एखादी संस्था आली तर सहकार्य केले पाहिजे. जर कोणाला वाटत असेल कारवाई चुकीची आहे तर न्यायालयाचे दरवाजे मोकळे आहेत. त्यांची न्यायालयीन लढाई सुरु आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी