30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजपरमबीरसिंग यांचा ईडीकडे धक्कादायक दावा, वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे...

परमबीरसिंग यांचा ईडीकडे धक्कादायक दावा, वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे निर्देश

टीम लय भारी

मुंबई:- मुंबई पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाव टाकला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरूनच वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते,(Parambir Singh’s shocking claim to ED)

असा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला आहे. सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात हा दावा केला आहे. परमबीर यांच्या जबाबामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थसंकल्प 2022 वर महाविकास आघाडीतील नेत्यांची खोचक टीका

देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

खासदार संजय राऊत यांचे भाजपला खुले आव्हान

“Know The Pain. My Father Was Killed”: BJP MP’s Reply To Rahul Gandhi

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणी ईडीने जानेवारी महिन्यात पुरवणी आरोपपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये परमबीरसिंग यांनी हा दावा केलेला आहे. वाझेला पुन्हा पोलिस सेवेत सामावून घेण्यासाठी आपल्यावर थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाव होता.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडूनही सूचना करण्यात आल्या होत्या,’ असे परमबीर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी