31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयकाँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर, हे योग्य नाही :...

काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर, हे योग्य नाही : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई : कॉंग्रेस प्रणित यूपीएचे अस्तित्व आहेच कुठे? असा सवाल करत ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले होते. यावर बहुतेक कॉंग्रेस नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे(Sanjay Raut’s reaction to Mamata Banerjee’s statement).  

संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेससोबत मिळून काम केले तर चांगली आघाडी तयार होईल. यूपीए महाराष्ट्रामध्ये आहे. महाविकास आघाडी त्याचेच प्रतिक आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही त्यांचा आदर करतो, असेही राऊत म्हणाले. “या गोष्टी सर्व आपल्याला विसरून जायला हव्यात. महाराष्ट्रातही आम्ही एकमेकांवर अनेक टीका करतो. पण भाजपाला थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि दोन वर्षांपासून आमचे सरकार चालत आहे. आम्ही एकत्र येवून काम करु शकतो हा आदर्श आम्ही देशासमोर उभा केला आहे. आम्ही परत ममतांची भेट घेऊ. आता युपीएला सोनिया गांधी चालवत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण संवादातून मार्ग निघेल,”

संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ; पण रोज पायदळी तुडवतात, संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं रामदास कदम यांच्यावर अन्याय? संजय राऊत म्हणाले…

“आदित्य ठाकरे आणि माझ्यासोबत ममतांची चर्चा झाली आहे. ममतांनी एक विचार घेऊन शरद पवारांशी संवाद साधला आहे. ममतांच्या बोलण्यातही दम आहे की यूपीएचे आज अस्तित्व नाही. ममतांचे म्हणणे सत्य आहे. कोणतीही आघाडी बनली तर ती काँग्रेससोबतच बनेल. अनेक राज्यात काँग्रेस मजबूत स्थितीत आहे,” असेही राऊत यावेळी म्हणाले.

पण आताही अंध भक्त बोलतील, ‘‘काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!’’

Mamata Banerjee may meet Sharad Pawar today; Aaditya Thackeray and Sanjay Raut call on Bengal CM in Mumbai

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी