30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeटॉप न्यूजSBI कडून दुचाकी कर्ज ‘SBI Easy Ride’ लाँच, YONO वर मिळणार एवढा...

SBI कडून दुचाकी कर्ज ‘SBI Easy Ride’ लाँच, YONO वर मिळणार एवढा कर्ज

टीम लय भारी

नवी दिल्लीः SBI Easy Ride: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने YONO द्वारे पूर्व मंजूर टू व्हीलर कर्ज योजना ‘SBI Easy Ride’ लाँच करण्याची घोषणा केलीय. पात्र SBI ग्राहक बँकेच्या शाखेत न जाता YONO अॅपद्वारे एंड-टू-एंड डिजिटल दुचाकी कर्ज घेऊ शकतात. ग्राहक 3 लाख रुपयांपर्यंतच्या दुचाकी कर्जासाठी अर्ज करू शकतात. 3 लाख कर्जावर जास्तीत जास्त 4 वर्षांच्या कालावधीसाठी 10.5% प्रति वर्ष दराने व्याज लागणार आहे. या योजनेत कर्जाची किमान रक्कम 20000 रुपये निश्चित करण्यात आलीय (SBI bank launch ‘SBI Easy Ride’ loan Scheme).

कर्ज थेट डीलरच्या खात्यावर पाठवले जाणार

एसबीआयकडून घेतलेले कर्ज थेट डीलरच्या खात्यावर पाठवले जाणार आहे. या योजनेंतर्गत वाहनाच्या ऑन-रोड किमतीच्या 85% पर्यंत कर्ज घेता येते. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणतात, “आम्हाला विश्वास आहे की, ही डिजिटल कर्ज ऑफर ग्राहकांना त्यांच्या आवडीची दुचाकी खरेदी करण्यास मदत करेल.

ऍमेझॉन फेस्टिवल सेल : खरेदी करा नवीन फोन स्वस्त किंमतीत

BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया

SBI मध्ये आमच्या ग्राहकांना सोयीस्कर आणि त्रासमुक्त बँकिंग अनुभव देणारी योग्य उत्पादने आणि सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. या कर्जाचा शुभारंभ करताना दिनेश खारा म्हणाले, कर्जाच्या या सुविधेमुळे ग्राहक थेट विकासाशी जोडले जातील. आम्हाला आशा आहे की, ‘SBI Easy Ride’ कर्ज योजना आमच्या ग्राहकांना एक सहज आणि संस्मरणीय दुचाकी चालवण्याचा अनुभव देईल.”

कर्ज वैशिष्ट्ये

SBI ग्राहक पूर्व मंजूर ‘SBI Easy Ride’ कर्ज घेऊ शकतात. 3 लाखांचे कर्ज सुलभ व्याजदरात मिळेल

पात्रतेनुसार ऑन-रोड किमतीच्या 85% पर्यंत कर्ज, कमाल 48 महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज मिळेल

EMI किमान रु. 2560/- प्रति लाख

मुंबईतील महिलेने OLX वर टाकली जाहिरात आणि गमावले पाच लाख रुपये

Bharti Airtel, SBI, Eicher Motors, Bank of India, Union Bank, Dabur India, HPCL stocks in focus

कर्जाची रक्कम डीलरच्या खात्यात त्वरित हस्तांतरित केली जाणार

हे कर्ज घेण्यासाठी शाखेत जाण्याची गरज नाही

बँकेने काय सांगितले?

SBI म्हणते की, सध्याच्या डिजिटल परिवर्तनादरम्यान YONO SBI ग्राहकांना त्यांच्या दारात बँकिंग सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये लॉन्च झाल्यापासून YONO ने 89 दशलक्ष डाऊनलोड आणि 42 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांसह ग्राहकांची मोठी उपस्थिती मिळवली. SBI ने YONO प्लॅटफॉर्मवर 20 पेक्षा जास्त श्रेणींमध्ये 110 हून अधिक ई-कॉमर्स कंपन्यांसोबत भागीदारी केली. भविष्यासाठी या प्लॅटफॉर्मवर योनो अॅग्रीकल्चर, योनो कॅश आणि पीएपीएल आणि अधिक सुविधा पुरवल्या जात आहेत.

SBI बद्दल जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया ही मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. ही देशातील सर्वात मोठी गहाण कर्जदार किंवा गहाण कर्ज देणारी बँक आहे ज्याने आतापर्यंत 3 दशलक्ष भारतीय कुटुंबांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. बँकेच्या गृहकर्ज पोर्टफोलिओने 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. 30 जून 2021 पर्यंत, बँकेकडे 46% च्या CASA प्रमाणासह 37 लाख कोटी रुपये आणि 27 लाख कोटी रुपये अॅडव्हान्स आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी