34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांकडून 'रयत'वर आणखी एका IAS अधिकाऱ्याला संधी

शरद पवारांकडून ‘रयत’वर आणखी एका IAS अधिकाऱ्याला संधी

टीम लय भारी

सातारा : आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेवर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पाठोपाठ आता आणखी एका निवृत्त IAS अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे ( Sharad Pawar appointed an IAS officer at Rayat Shikshan Sanstha ).

सातारा जिल्ह्यातील निढळचे सुपुत्र व निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी ( Retired IAS officer Chandrakant Dalavi appointed in Rayat Shikshan Sanstha ) यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख व दळवी यांच्या रूपाने दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांना रयतचे अध्यक्ष शरद पवार यांनी काम करण्याची संधी दिली आहे.

Advt
जाहिरात

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे रोपटे आता वटवृक्ष बनले आहे. त्यामुळे आशिया खंडातील मोठ्या शिक्षण संस्थेत रयतचे नाव अग्रभागी घेतले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे या संस्थेवर वर्चस्व आहे.

काही दिवसांपूर्वीच सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर अध्यक्ष पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मॅनेजिंग कॉन्सिलची बैठक झाली. त्यात साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विजयमाला पतंगराव कदम, आमदार मकरंद पाटील, निलीमा पोळ यांची जनरल बॉडी सदस्यपदी तसेच मॅनेजिंग कौन्सिलवर निमंत्रित सदस्यांच्या नव्याने निवडी करण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा होणार हायटेक, आदर्श गाव ‘निढळ’चे आणखी एक पाऊल

यावेळी निमंत्रित सदस्यपदी जिल्ह्याचे सुपुत्र व माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांची नियुक्ती केली आहे. दळवी यांनी प्रशासकीय सेवेत असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आजही प्रशासनात कायम आहे. झिरो पेंडन्सी पॅटर्न त्यांनी प्रशासनात राबवण्याचा प्रयत्न केला.

शरद पवारांकडून 'रयत'वर आणखी एका IAS अधिकाऱ्याला संधी
जाहिरात

त्याशिवाय प्रशासनात विविध उच्च पदावर असताना केलेले काम लोकाभिमुख व उल्लेखनीय राहिले आहे. निढळ गावाच्या विकासातही त्यांचे मोलाचे योगदान आहे.

दळवी यांच्या नेतृत्वाखाली निढळमध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा उभी राहिली. शाळेचा चेहरामोहरा पालटण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. प्रशासन, ग्रामविकास व शिक्षण या क्षेत्रातील दळवी यांचा दांडगा अनुभव लक्षात घेऊन त्यांची रयमध्ये नियुक्ती केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी