29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजदेशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपाला वाटते : सत्यजीत तांबे

देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपाला वाटते : सत्यजीत तांबे

टीम लय भारी

मुंबई : काँग्रेस विरूध्द महाआघाडी सामना जोरात रंगला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप जोरदार सुरु आहे. या देशात अमर, अकबर, अँथनी  कधीही गुण्यागोविंद्याने आणि एकत्र राहू नयेत. असे भाजपच्या स्थापनेपासूनच त्यांना हे वाटत आले आहे. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीही बंच ऑफ थॉट्स मध्ये हीच शिकवण दिली आहे. इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. बाकी महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी असं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

काय आहे प्रकरण…

शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार की नाही? याची चर्चा सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे अयोध्येला जातील असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान,  भाजपा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. निमंत्रण आले नसले तरीही रामभक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोद्ध्येला जाणार का? असा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर पहले मंदिर फिर सरकार असं म्हणणारे ठाकरे आथा पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं. याच टीकेला सत्यजीत तांबे यांनी उत्तर दिलं आहे.  सध्या महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा सामना जोरात रंगला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी