34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयज्या देशात सुई सुद्धा निर्माण होत नव्हती तिथे आज रेल्वेची इंजिन तयार...

ज्या देशात सुई सुद्धा निर्माण होत नव्हती तिथे आज रेल्वेची इंजिन तयार होतात : शरद पवार

टीम लय भारी

सोलापूर : स्था. स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादी पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्या भारतात सुई सुद्धा निर्माण होत नव्हती तिथे आज रेल्वेचं इंजिन तयार होत आहेत. मात्र केंद्र सरकार त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट घालत आहे. असे शरद पवार म्हणाले (Sharad Pawar attack on the BJP’s central government).

दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या भारत देशात विकास नव्हता. आज केंद्र सरकार काय करतंय, रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात त्यांना रस आहे. आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे महागाईचा. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहे. सगळ्याच गोष्टी महाग होत चालल्या आहेत , त्यामुळे सामान्य माणसाचे मात्र हाल होत आहेत. असे पवार म्हणाले.

Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांचे तरूणांच्या कल्याणासाठी मोठे पाऊल

पं. जहवारलाल नेहरूंनी या देशात पायाभूत सुविधा लोकांना कशा देता येतील यासाठी प्रयत्न केले. रेल्वेचं जाळं वाढवलं वीज निर्मितीची केंद्र त्यांनी उभी केली. परंतु आताच केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीचं खासगीकरण करत आहे. रेल्वेचं इंजिन असो, रेल्वे लाईन असो, रेल्वे स्टेशन असो सगळ्याचं केंद्र सरकार खासगीकरण करत आहे.

ज्या देशात सुई सुद्धा निर्माण होत नव्हती तिथे आज रेल्वेची इंजिन तयार होतात : शरद पवार

Sharad Pawar : शरद पवारांनी रस्त्यावर गाडी थांबवून दिला नव वधू-वरांना आशिर्वाद !

I-T Raids Could Be Result Of Lakhimpur Kheri Criticism, Says Sharad Pawar

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी