31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयनागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत शिवसेना स्वबळावर लढणार

नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत शिवसेना स्वबळावर लढणार

टीम लय भारी

नागपूर :-  नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम लागले आहे. महाविकास आघाडीत तडा गेल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत. शिवसेनेने ही पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे (Shiv Sena has decided to contest this by-election on its own).

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुक एकत्र लढण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले नाही. त्यामुळे शिवसेना आता स्वबळावर लढणार असल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे (The by-elections of Nagpur Zilla Parishad will see a triangular contest between Shiv Sena, BJP and Congress-NCP).

पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर अश्लिल शब्दात टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!

भारताच्या तिरंदाज दीपिका कुमारीला फ्रांस मध्ये तब्बल तीन सुवर्णपदके

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 61 जागांवर पोटनिवडणुक होणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र रिंगणात उतरू असा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र, राष्ट्रवादीने यावर कोणतेही उत्तर दिले नसल्याची माहिती सूत्रांनी दिल आहे. त्यामुळे शिवसेनेने ही पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे (Shiv Sena has announced to contest this by-election on its own).

शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी दिली. कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे असे आशिष जैसवाल यांनी सांगितले. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असे चित्र पाहायला मिळणार आहे (In the upcoming by-elections, Shiv Sena vs BJP vs Congress-NCP alliance will be seen).

Shiv Sena has decided to contest this by-election on its own
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

यंदाचा गणशोत्सवही साधेपणाने – सरकारने जाहीर केली नियमावली

Smoothing over issues in MVA: Sharad Pawar meets Uddhav Thackeray

काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. यात काही बदल होणार नाही. यावेळी ते म्हणाले होते, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही. आम्ही स्वबळावर लढणार अशी घोषणा नाना पाटोलेंनी केली होती.

यानंतर आता राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादी नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. यानंतर पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी