31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमी येणारच, पण ते येणारच हे त्यांना काही जमेना : शरद पवार

मी येणारच, पण ते येणारच हे त्यांना काही जमेना : शरद पवार

टीम लय भारी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मी पुन्हा येणारच, पण ते येणारच हे त्यांना काही जमेना, असे म्हणत पवार यांनी फडणवीस यांच्यावर मजेशीर टीका केली आहे. पिंपरी चिंचवड येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्या वेळी ते बोलत होते (Sharad Pawar’s funny criticism on Devendra Fadnavis).

महाविकास आघाडी सरकारला  आता २ वर्ष पूर्ण व्हायला आली, पण तरी हे लोक म्हणतात हे सरकार टिकणार नाही. तसेच काही लोक निवडणुकांसाठी सतत सांगत होते ‘मी येणारच पण ते येणारच हे काही जमेना’ , असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानावर टीका करताना हे उदगार काढले आहेत.

Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांचे तरूणांच्या कल्याणासाठी मोठे पाऊल

तसेच अस्वस्थ झालेले हे लोक सत्तेचा गैरवापर करून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ईडी, एनसीबीच्या या कारवाया द्वेषापोटी होत असल्याचे ही पवार या वेळी म्हणाले.

Sharad Pawar : ‘शेतकरी दिना’निमित्त शरद पवारांचं खास Tweet ! म्हणाले…

Sharad Pawar Says His Party “Will Back Akhilesh Yadav” For UP Polls

यावेळी शरद पवार यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल हे उत्पन्न वाढवण्याचं साधनच आहे असा केंद्राचा दृष्टिकोन झाला आहे. जेव्हा आम्ही दरवाढ केली तेव्हा भाजपने दहा दिवस संसदेचं कामकाज रोखलं होतं. असे म्हणत त्यांनी केंद्र सामान्य माणसाला महागाईत ढकलत आहे अशी ही टीका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी