30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयशिवसेना नेत्या मनीषा कायंदेंकडून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका

शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंकडून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका

टीम लय भारी

मुंबई : एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. असे म्हणत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी भाजप नेत्या चित्र वाघ यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना रावणाची बहीण शूर्पणखेची उपमा दिली होती (Shiv Sena leader Manisha Kayande lashes out at BJP leader Chitra Wagh).

यावर आता मनीषा कायंदे यांनी चित्र वाघ यांच्यावर केली आहे. एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. तसेच वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत याचे दर्शन घडवले. एक सहकारी म्हणून चित्रा वाघ यांनी चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. असे ही कायंदे या वेळी म्हणाल्या.

पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला;…. मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही!

अहो गोपीचंद पडळकर, आम्ही भंगार विकतो; पण तुमच्या नेत्यांनी तर देश विकायला काढला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज राजापूरकरांचे टीकास्त्र

चाकणकर यांना शूर्पणखेची उपमा दिल्यामुळे, वाघ यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवले. तसेच चित्रा वाघ यांना एखादं मानाचं पद मिळालं असतं तर आम्ही त्यांचे कौतुकचं केले असते. असे ही कायंदे या वेळी म्हणाल्या. तसेच भाजप आमदार राम कदम मुली पळवण्याची भाषा करतात. यावर चित्रा वाघ काहीच बोलणार नाहीत, असे म्हणत कायंदे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

आर्यन खानला एनसीबीने सुपर डुपर स्टार बनवलं, राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट चर्चेत

Maharashtra govt beefs up minister Nawab Malik’s security after receiving threat calls

चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा परंतु रावणाला मदत करणाऱ्या शूर्पणखेला बसवू नका. असा हल्ला चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केला होता. तसेच चाकणकरणांची निवड झाल्यामुळे प्रत्येकवेळी सरकारचचं नाक कापलं जाईल अशी टीका देखील वाघ यांनी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी