31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयशिवसेनेची चूक काढताना भाजपच आपटले तोंडावर

शिवसेनेची चूक काढताना भाजपच आपटले तोंडावर

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात त्यांच्या कडून चूक झाली होती. अमृतमहोत्सवाला ते हिरकमहोत्सव बोलले होते. ही त्यांची चूक भाजपने उचलून धरली. त्यांना लक्षात आणून देण्यासाठी भाजपने ट्विट करत कोणत्या वर्षाला काय बोलतात हे सांगणारी पोस्ट ट्विटरवर पोस्ट केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांची ही चूक दाखवताना भाजपनेच व्याकरणात चूक केली आणि स्वतःचे हसे करून घेतले (Shiv Sena While making a mistake of BJP).

15 ऑगस्ट रोजी आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा 70 वा म्हणजेच अमृतमहोत्सव होता. मुख्यमंत्री भाषणात चुकून हीरकमहोत्सव असे बोलले होते. ह्या मुख्यमंत्र्यांच्या चुकीला विरोधकांनी चांगलेच उचलून धरले होते. सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका करत हसे उडवले होते (BJP and Everyone was laughing critically at the Chief Minister).

भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमक्या

पुण्याच्या सैन्य क्रीडा स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव

भाजपने मुख्यमंत्र्यांच्या ह्या चुकीला गांभीर्याने घेत सकाळी एक पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये कोणत्या वर्षी कोणता वर्ष महोत्सव असतो हे लिहिली होते. त्यात 60 व्या वर्षी हीरकमहोत्सव साजरा केला जातो असे लिहिताना त्यांच्याकडून शुद्धलेखनात हीरक ऐवजी ‘हरिक’ असे लिहिले होते. ही चूक भाजपला चांगलीच महागात पडली आहे. ट्विटरवर भाजपची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. भाजपने तर ही पोस्ट ट्विटवरून काढून टाकली.

Shiv Sena While making a mistake of BJP
प्रबोधन करणे आवश्यकच आहे, असे बोलून भजपनेच केली चूक

39 वर्षे सोबत होतो, भरपूर मसाला आहे माझ्याकडे : राणेंनी केला गौप्यस्फोट

BJP leader calls Uddhav Thackeray ‘father of intolerance’

ह्या टिकेची खिल्ली उडवत प्रशांत धुमाळ ह्या व्यक्तीला तर अशाच एक झालेल्या घटनेची आठवण झाली. आज भाजपचा अवधूत गुप्ते झालाय असे ते बोलले. जयंत पाटील यांच्या ट्विटमधील व्याकरणाची चूक काढताना स्वतःच्या ट्विटमध्येच चूक करून बसले होते. त्यानंतर ट्रोल झाल्यावर ट्विट डिलीट करून ते गायब झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी