32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयअजित पवार आणि शाहू महाराजाच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केले मत...

अजित पवार आणि शाहू महाराजाच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केले मत…

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाज आणि संभाजी राजे (Sambhaji Raje) आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची भेट घेऊन संवाद साधला. त्यांच्या भेटीनंतर संभाजी राजेंनी त्यांचे मत व्यक्त केले आहे (Sambhaji Raje has expressed his opinion).

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar) सोमवारी कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराजांची (Shahu Maharaj) भेट घेत चर्चा केली. अजित पवार (Ajit Pawar) आणि छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती. दरम्यान मराठा आरक्षणावरुन सध्या आक्रमक असणारे छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतसिंगच्या मृत्यूचे गूढ सीबीआय का लपवत आहे?; सचिन सावंत

उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर खोचक टिका

Adani Group says reports of freeze on foreign funds ‘blatantly erroneous’

संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी पुण्यात उदयनराजेंची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भेटीसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “अजित पवार (Ajit Pawar) यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झाले याची माहिती नाही. ही भेट होणार आहे याची मला कल्पना नव्हती. मला राजमहालातून कळवण्यात आले होते. पण काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे”.

अजित पवार भेटीनंतर छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले

आमच्यात सर्व गोष्टींमध्ये चर्चा झाली असून अजित पवार (Ajit Pawar) यासंबंधी सविस्तर सांगतील असे छत्रपती शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) यावेळी सांगितले. तसेच समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगले करता येईल ते करा असे मार्गदर्शन केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

“सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केले पाहिजे,” असे मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही”.

“मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे,” असेही मत त्यांनी व्यक्त केले. “सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणे गरजेचा आहे. त्याचे मराठीत भाषांतर करुन समजून घेतला पाहिजे. तसेच कोर्टाचा अवमान होता कामा नये,” असेही ते म्हणाले.

“केंद्र सरकारने जर येथे लक्ष दिले आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचे पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितले पाहिजे. कायद्यात काय बसते हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही,” असे यावेळी ते म्हणाले. मराठ्यांसाठी जास्तीत करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटले तर कसे आणून देणार अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

अजित पवारांची प्रतिक्रिया

“चहाच्या निमित्ताने मी गेलो होतो त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाली,” अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) कोल्हापुरात आयोजित बोलताना माहिती दिली. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. मोदीं पुढेही हा मुद्दा मांडला होता. आमची काय मागणी होती ते देखील सांगितले होते. आरक्षणाच्या संदर्भात बिल आणून ते मांडून कायदा करावा अशी विनंती केली होती असेही यावेळी ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी