31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाIPL 2023: गुजरात टायटन्सचं टेंशन वाढलं; कर्णधार पांड्या खेळातून बाहेर

IPL 2023: गुजरात टायटन्सचं टेंशन वाढलं; कर्णधार पांड्या खेळातून बाहेर

हार्दिक पांड्या कोलकाता विरुद्ध गुजरातच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे गुजरातच्या संघाची कमान आज रशीद खानच्या खांद्यावर असणार आहे.

आयपीएल 2023 च्या 13 व्या सामन्यात सध्या गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत सुरु होणार आहे. सुपर संडेचा आजचा (9 एप्रिल) पहिला सामना गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होत आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून गुजरातच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकली आहे. पण नाणेफेकीचा रशीद खान येताच सर्वांना एकच आश्चर्याचा धक्का बसला. कारण नाणेफेकीचा स्वतः कर्णधार हार्दिक पांड्या नसून रशीद खान आला होता. त्यामुळे पांड्या खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची तब्येत बिघडली आहे. गुजरात टायटन्स आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी अतिशय अस्वस्थ करणारी आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, त्याने हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहे.

IPL 2023: गुजरात टायटन्सचं टेंशन वाढलं; कर्णधार पांड्या खेळातून बाहेर

सामन्यापूर्वी अष्टपैलू रशीद खान नाणेफेकसाठी हार्दिक पांड्याच्या जागी मैदानावर पोहोचला. दरम्यान, त्याने हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खान म्हणाला की, “हार्दिक पांड्याची तब्येत थोडी ठीक नाही. त्याच्याबाबतीत आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे तो या सामन्यात विश्रांती घेणार आहे. त्याच्या जागी विजय शंकरचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोलकाता संघात दोन बदल करण्यात आले आहेत. टीम साऊथीसाठी लॉकी फर्ग्युसन आणि मनदीप सिंगसाठी नारायण जगदीसन आले आहेत.

हे सुद्धा वाचा :

KKRच्या यशानंतर एकत्र थिरकले दोन्ही KINGS; चाहत्यांनी केला एकच कल्लोळ

सामना जिंकूनही धोनीने दिली चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची WARNING!

आजपासून रंगणार ‘आयपीएल’चा महासंग्राम!

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन):
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन):
ऋद्धिमान साहा(यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान (कर्णधार), मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल

IPL 2023, Gujarat Titans captain hardik Pandya out of the game, Hardik Pandya

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी