32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाचेन्नई विरुद्ध सामन्यात ऋषभ पंतने केली ही मोठी चूक, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड 

चेन्नई विरुद्ध सामन्यात ऋषभ पंतने केली ही मोठी चूक, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड 

IPL 2024 मध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सयांच्यामध्ये (DC vs CSK) सामना खेळण्यात आला. या सामन्यादरम्यान दिल्लीचा कर्णधार  ऋषभ पंतकडून चूक झाली. त्यांची शिक्षा म्हणून बीसीसीआय ने पंतला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंत वर दंड ठोठावला आहे. (IPL 2024 Rishabh pant has been fined 12 lakhs) दिल्लीच्या संघाने चेन्नईचा पराभव करून या हंगामात आपला पहिला विजय मिळवला आहे.  मात्र, हा सामना जिंकल्यानंतर दिल्लीच्या कर्णधाराला स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंतवर दंड ठोठावण्यात आला आहे. 

पंजाब किंग्स विरुद्ध सामन्याआधी लखनऊ सुपर जायंट्समध्ये झाली ‘या’ वेगवान गोलंदाजाची एन्ट्री

दिल्ली कॅपिटल्स संघ नियमित वेळेत 20 षटके पूर्ण करू शकला नाही, संघ निर्धारित वेळेपेक्षा 3 षटके मागे होता. या कारणास्तव, शेवटच्या दोन षटकांमध्ये संघाला 4 ऐवजी 5 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आत ठेवावे लागले. स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने ऋषभ पंतला 12 लाखांचा दंड ठोठावला आहे. (IPL 2024 Rishabh pant has been fined 12 lakhs)

हार्दिक पांड्यासोबत होत असलेल्या गैरवर्तनाला पाहून भडकला आर अश्विन, चाहत्यांना फटकारले

आयपीएल प्रेस रिलीझनुसार, ‘दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या त्यांच्या टीमने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध डॉ. वाईएस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे 31 मार्च रोजी झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा असल्याने पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.’ (IPL 2024 Rishabh pant has been fined 12 lakhs)

गौतम गंभीर ने मारली विराट कोहलीला मिठी, सुनील गावस्कर म्हणाले, ‘ऑस्कर अवॉर्डसाठी पात्र…’

आयपीएल 2024 मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिलाच गुन्हा आहे, त्यामुळे कर्णधाराला फक्त 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जर दिल्लीने हंगामात दुसऱ्यांदा अशी चूक केली तर कर्णधाराला 12 लाख ऐवजी 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल. याचबरोबर संघातील इतर खेळाडूंनाही शिक्षा भोगावी लागणार आहे. दुसऱ्यांदा ही चूक केल्याबद्दल, खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% (जे कमी असेल) दंड आकारला जातो. जर संघाने तिसऱ्यांदा ही चूक केली तर कर्णधारावर 30 लाख रुपयांच्या दंडासह एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे, यासोबतच संघातील उर्वरित खेळाडूंना (कर्णधार वगळता) 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे किंवा त्यांची मॅच फी  50% (जे कमी असेल) दंड आकारला जातो. (IPL 2024 Rishabh pant has been fined 12 lakhs)

IPL 2024 मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे दंड भोगणारा ऋषभ पंत हा दुसरा कर्णधार आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल वर सुद्धा हा दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सही स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी