32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाजागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: नीरज चोप्रासहित डी. पी. मनू, किशोर जैना यांचा अंतिम...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: नीरज चोप्रासहित डी. पी. मनू, किशोर जैना यांचा अंतिम फेरीत प्रवेश

भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने शुक्रवारी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हंगेरीतील बुडापेस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत दमदार कामगिरी करून नीरजने थेट २०२४ पॅरिस ऑलिंपिकसाथी देखील पात्रता मिळवली आहे. नीरज सोबतच भारताच्या डी. पी. मनू आणि किशोर जैना यांनीदेखील अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे, जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रथमच तीन भारतीय एकत्र दिसणार आहेत.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ ही हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे १९ ते २७ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जात आहे. अ गटातील पात्रता फेरीत स्थान मिळालेल्या, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटरची जबरदस्त फेक केली. जगातील अव्वल रँकिंग भालाफेकपटू म्हणून चॅम्पियनशिपमध्ये गेलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात जबरदस्त थ्रोसह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. नीरजने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी देखील पात्रता मिळवली आहे. ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी ८५.५५ मीटर थ्रो करणे आवश्यक होते.

नीरजने ८८.७७ मी. भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले. ८१. ३१ मि. चा थ्रो करत डी. पी. मानू सहाव्या तर किशोरला ८०.५५ मी. च्या थ्रोसह नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भारतासह पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ब गटात ८६.७९ मी ची भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले. आता, रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे.

हे ही पहा 

एशिया कपसाठी टीम इंडिया सज्ज; कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात ‘या’ खेळाडूंना संधी

गोदावरी, एकदा काय झालं चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर; सांगलीच्या शेखर रणखांबेच्या रेखा माहितीपटाला पुरस्कार

अजित पवार आमचेच नेते, शरद पवारांचे धक्कादायक विधान; पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा

पात्रता फेरीच्या अ गटात नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ चा थ्रो केला. अंतिम फेरी साठी पात्र होण्यासाठी ८३ मीटरचा पात्रता मार्क होता. त्यामुळे,पाहिल्यांच प्रयत्नात नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. डी. पी. मणूने पहिल्या प्रयत्नात ७८.१० मीटर चा थ्रो केला. दुसऱ्या फेरीत त्याला ८१.३१ मीटर लांब भाला फेकता आला. जर्मनीच्या ज्युलियन वेबरला ८२.३९ मीटरव्हा भालाफेक करता आला.

ब गटातून पाकिस्तानच्या अर्शद नदीमने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.७९ मीटरचा थ्रो करून अंतिम फेरीसह २०२४ पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली. झेक रिपब्लिकच्या जाकूब वॅड्लेजने ८३.५० मीटर थ्रो करत फायनल साठी जागा मिळवली. भारताचा किशोर जैना पहिल्या प्रयत्नात ८०.५५ मीटर भालाफेक करू शकला. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरल्यामुळे त्याला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी