30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रीडापॉइंटस् टेबल आयपीएल : RR अव्वल, KKR दुसऱ्या स्थानी

पॉइंटस् टेबल आयपीएल : RR अव्वल, KKR दुसऱ्या स्थानी

शिखर धवन ऑरेंज कॅप तर रशीद पर्पल कॅप लीडर्स; PBKS vs SRH सामन्यात शिखर धवनची शानदार नाबाद 99 धावांची खेळी, स्ट्राइक रेट 149 वर पोहोचला आहे. या मोसमात विजय मिळवता न आलेल्या संघात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोनच टीम आहेत. सोमवारी LSG लखनौने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केल्यास त्यांना गुणतालिकेत शीर्षस्थानी जाण्याची संधी मिळू शकते. जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी

पॉइंटस् टेबल आयपीएल नुसार, आता RR अव्वल, KKR दुसऱ्या स्थानी आहेत. गतविजेत्या गुजरात टायटन्सला कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी थरारक लढतीत पराभूत केले. GT vs KKR सामन्यानंतर आता केकेआरचा संघ आयपीएल 2023 पॉइंटस् टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. NRR म्हणजे नेट रन रेटच्या आधारावर कोलकाता संघ आता राजस्थान रॉयल्सच्या मागे आहे. पहिल्या तीन सामन्यांतून RR आणि KKR तय दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण झाले आहेत. मात्र, राजस्थान 2.067 एनआरआरमुळे तालिकेत 1.375 एनआरआर असलेल्या कोलकाताच्या पुढे आहे.

दुसरीकडे, शिखर धवन ऑरेंज कॅप तर रशीद पर्पल कॅप लीडर्स आहेत. PBKS vs SRH सामन्यात शिखर धवनची शानदार नाबाद 99 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याचा स्ट्राइक रेट आता 149 वर आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स सध्या 3 सामान्यांमधून 4 गुणांसह पॉइंट टेबलवर तिसर्‍या स्थानावर आहे. मोसमातील पहिल्या पराभवानंतर GT चौथ्या स्थानावर घसरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) सोमवारी LSGची लढत आहे. बंगलोर संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत केल्यास लखनौ संघाला गुणतालिकेत शीर्षस्थानी जाण्याची संधी मिळू शकते.

2023 IPL Points Table
आयपीएल 2023 पॉइंटस् टेबल (सौजन्य : @IPL / iplt20.com)

सनरायझर्स हैदराबादने रविवारी पंजाब किंग्जचा आठ गडी राखून पराभव करत हंगामातील पहिला विजय मिळवला. हैदराबादमध्ये घरच्या मैदानावरील कामगिरीने गुणतालिकेतून बाहेर जाण्यापासून वाचण्यात त्यांनी यश मिळविले. SRH चे आता 3 सामन्यांत 2 गुण असून ते टॉप 8 मध्ये शेवटच्या स्थानी आहेत. PBKSने 3 सामन्यांतून 4 गुणांसह सहावे स्थान गाठले आहे. या मोसमात विजय मिळवता न आलेल्या संघात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोनच टीम आहेत.

Shikhar Dhawan tops aramco Orange cap of TATAIPL 2023
शिखर धवन आयपीएल 2023 ऑरेंज कॅप यादीत पहिल्या स्थानी आहे. (फोटो क्रेडिट : @IPL / iplt20.com)

PBKSचा कर्णधार शिखर धवनने SRH विरुद्ध शानदार नाबाद 99 धावांची खेळी केली. त्यामुळे IPL 2023 हंगामासाठी ऑरेंज कॅपचा आता तो नवीन दावेदार आहे. धवनने फक्त 3 सामन्यांत दोन अर्धशतकांसह 149 च्या स्ट्राइक रेटने 225 धावा ठोकून काढल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या 3 सामन्यांत दोन अर्धशतकांसह 189 धावा आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो आता दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला. ऑरेंज कॅप टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 3 सामन्यांत 158 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर आणि आयपीएल 2022 ऑरेंज कॅप विजेता जोस बटलर 180.9 च्या स्ट्राइक-रेटने 3 सामन्यांत 152 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

हे सुद्धा वाचा : 

IPL 2023: गरिबाच्या पोराची कमाल; 5 चेंडूंवर 5 षटकार मारत रिंकू ठरला KKRचा हिरो

औकात मे रहो पाकिस्तानियो पाकिस्तानी पत्रकाराने PSLची IPLशी तुलना केल्याने भारतीय क्रिकेट चाहते संतापले

सामना जिंकूनही धोनीने दिली चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची WARNING!

Rashid Khan leading wicket-tally aramco Purple Cap holder
राशिद खान आयपीएल 2023 पर्पल कॅप यादीत अव्वल स्थानी आहे. (फोटो क्रेडिट : @IPL / iplt20.com)

GTचा लेग-स्पिनर आणि स्टँड-इन कर्णधार राशिद खान आयपीएल 2023 मध्ये 3 सामन्यांत 8 बळी घेऊन पर्पल कॅप यादीत अव्वल स्थानी आहे. रशीदने KKR विरुद्ध आयपीएल 2023 हंगामातील पहिली हॅट्ट्रिक साधली होती. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. राजस्थान रॉयल्सचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहल 3 सामन्यांत 8 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे, तर LSGचा वेगवान गोलंदाज मार्क वुड 2 सामन्यांत 8 बळी घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे. LSG लेग-स्पिनर रवी बिश्नोई, KKR ऑफ-स्पिनर सुनील नरेन चौथ्या स्थानावर आहेत. GTचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ 3 सामन्यांत 6 विकेट्ससह विकेट-टेकर्सच्या यादीत 5 व्या स्थानावर पोहोचला आहे.

Points Table IPL, Shikhar Dhawan, PBKS vs SRH, GT vs KKR, IPL 2023 Points Table

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी