36 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeक्रिकेटIPL 2023: गरिबाच्या पोराची कमाल; 5 चेंडूंवर 5 षटकार मारत रिंकू ठरला...

IPL 2023: गरिबाच्या पोराची कमाल; 5 चेंडूंवर 5 षटकार मारत रिंकू ठरला KKRचा हिरो

सध्या देशात आयपीएलचा महासंग्राम जोरदार सुरू आहे. प्रत्येक मॅच वेगळी आणि अटीतटीची ठरत आहे. अशातच  काल कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध झालेला सामना खूपच रोमांचक होता. सामन्याच्या शेवटी गुजरातच्या पारड्यात झुकणाऱ्या यशाला रिंकू सिंहच्या जबरदस्त फलंदाजीने बाजीच पलटवून लावली. कोलकाता नाइट रायडर्सच्या रिंकू सिंहने काल गुजरात टायटन्स विरुद्ध कमालीची बॅटिंग केली. त्याने लास्ट ओव्हरमध्ये सलग 5 चेंडूंवर 6,6,6,6,6 सिक्स मारले आणि नवा विक्रम बनविला. KKR च्या हातून निसटलेला सामना त्याने जिंकवून दिला. रिंकू सिंहची बॅटिंग पाहून भल्या-भल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तो अशी काही अचाट कामगिरी करेल, याची कोणालाही कल्पना नव्हती.

रिंकू आज आयपीएलमध्ये यश मिळवत असला, तरी इथवर पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागलाय. त्याचे वडिल घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचे काम करायचे. 2 खोल्यांच्या घरात त्याचं बालपण गेले आहे. क्रिकेट खेळल्यामुळे त्याने वडीलांचा मार देखील खाल्ला आहे. सुरुवातीला रिंकूचे वडील त्याच्या क्रिकेट खेळण्याविरोधात होते. पण, जेव्हा त्याने क्रिकेट खेळून दुचाकी जिंकली तेव्हा वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्याला समर्थन दिलं. नंतर त्याच दुचाकीने त्याचे वडील सिलेंडर वितरणासाठी जाऊ लागले. कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याचं काम करण्याचा विचार त्याच्या मनात आला. पण त्या परिस्थितीतही त्याने खेळावर लक्ष केंद्रीत केले. खेळाप्रती आवड आणि सातत्य ठेवत तो उत्तर प्रदेशच्या अंडर 16, अंडर 19 आणि अंडर 23, सेंट्रल झोनमधून खेळताना तो रणजी पर्यंत पोहोचला. 2017 साली आयपीएलमध्ये एंट्री केली. 2018 मध्ये त्याने पंजाबसोडून कोलकाताची निवड केली.

हे सुद्धा वाचा : 

IPL 2023: गुजरात टायटन्सचं टेंशन वाढलं; कर्णधार पांड्या खेळातून बाहेर

IPL 2023: अरिजितने धोनीसमोर नतमस्तक होऊन पायाला केला स्पर्श!

‘औकात मे रहो पाकिस्तानियो’: पाकिस्तानी पत्रकाराने PSLची IPLशी तुलना केल्याने भारतीय क्रिकेट चाहते संतापले

कालच्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना एकदम रोमांचक झालेला पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सने केकेआरला विजयासाठी 205 धावांच टार्गेट दिलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआर संघाला तब्बल 29 धावांची गरज होती, त्यामुळे हा सामना संपूर्णपणे गुजरातच्या पारड्यात झुकलेला होता. मात्र रिंकू सिंग या युवा खेळाडूने शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल पाच षटकार मारत हा सामना केकेआरच्या नावावर केला हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला.

गुजरातच्या गोटात सेलिब्रेशन सुरु झालं होतं. कारण 6 चेंडूत 29 धावा जवळपास अशक्य वाटत होतं. गुजरात टायटन्सचा यश दयाल लास्ट ओव्हर टाकत होता. पहिल्या बॉलवर सिंगल काढून उमेश यादवने रिंकू सिंहला स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकूने जे केलं, ते अद्भूत होतं. अशा चमत्काराची कोणीही अपेक्षा केली नव्हती. रिंकूने यशच्या 5 चेंडूंवर 5 सिक्स मारले. 6 वा चेंडू असता, तर त्या बॉलवरही सिक्स मारला असता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी