33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाT20 World Cup : वर्ल्डकप आधीची पत्रकार परिषद बाबर आझमने गाजवली! कर्णधार...

T20 World Cup : वर्ल्डकप आधीची पत्रकार परिषद बाबर आझमने गाजवली! कर्णधार रोहित बाबत केलं मोठं विधान

पत्रकार परिषदेत बाबर आझमला रोहित शर्माबद्दल विचारले असता तो म्हणाला, 'तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी त्याच्याकडून अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याने क्रिकेटसाठी खूप काही केले आहे."

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने टी20 विश्वचषकापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याने मने जिंकली. शनिवारी (15 ऑक्टोबर) आयसीसीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टी20 विश्वचषकात सहभागी सर्व संघांचे कर्णधार सहभागी झाले होते. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सर्व संघांचे कर्णधार एकत्र स्टेज शेअर करताना दिसले. पत्रकार परिषदेत बाबर आझमला रोहित शर्माबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी त्याच्याकडून अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याने क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. मी प्रयत्न करतो की शिकलेल्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या असतील.” रोहित आणि बाबरच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले होते
टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ 23 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. सध्याच्या टी20 विश्वचषकात दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल. अशा स्थितीत दोघेही विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. हायव्होल्टेज सामन्यात दोन्ही संघांवर विजयाचे दडपण असेल. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ दोनदा आमनेसामने आले होते, जिथे दोघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता.

हे सुद्धा वाचा

Big Boss 16 : ‘मला शर्ट काढायला भाग पाडू नका’, बिगबॉसच्या सेटवर भाईजान भडकला! पाहा व्हिडिओ

INDvsPAK : अखेर 15 वर्षानंतर टीम इंडिया करणार पाकिस्तान दौरा! जाणून घ्या काय आहे विशेष कारण

Varun Dhawan : आलिशान जीवन सोडून वरुण धवनची रिक्षा सफारी! फोटो शेअर करत उलघडले गुपित

बाबरबाबत रोहितने हे वक्तव्य केले
यावेळी रोहित शर्मा म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्धचा सामना आमच्यासाठी मोठा आहे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे आणि समजले आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की आपण नेहमी सारखेच बोलले पाहिजे. आशिया चषकाप्रमाणे जेव्हाही आम्ही एकमेकांना भेटतो आणि इथे भेटतो तेव्हा आम्ही एकमेकांच्या आणि कुटुंबाच्या हिताची विचारपूस केली. आपण फक्त त्या गोष्टीबद्दल बोलतो. मी भेटलेले त्यांचे सर्व सहकारी, आम्ही असेच संवाद साधत असतो. आमचे पूर्वीचे सिनियर्स पण होते, ते सुद्धा आयुष्याबद्दल बोलायचे, कोणती गाडी घ्यायची आणि कोणती नवीन गाडी घ्यायची?

भारत 15 वर्षांपासून विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 15 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. 2007 साली भारताने पहिल्यांदा आणि शेवटचा टी20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने इतिहास रचला होता. यंदा कर्णधार रोहित शर्माला धोनीने रचलेल्या इतिताहासची 15 वर्षांनंतर पुनरावृत्ती करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी